Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच देश विदेश फोटोगॅलरी मुख्य बातम्या

३०० वृक्ष, ९७२ लिफ्ट आणि १५ हजार कामगार; हैद्राबादमध्ये अमेझॉनचे जगातील सर्वात मोठे कार्यालय

Share

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक | प्रतिनिधी 

जगात अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत. कर्मचाऱ्यांना कार्यालयात काम करत असताना वेगवेगळ्या सुविधा मिळाव्यात जेणेकरून कामात अचूकता येते परिणामी कंपनीला फायदा होतो असे म्हटले जाते. यासाठी कंपन्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील असतात.

अमेझॉनकडून अशाच एका भव्य कार्यालयाची उभारणी हैद्राबादमध्ये करण्यात आली आहे. नानाविध सुविधा त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी देऊ केल्या आहेत. एकाच वेळी याठिकाणी १५ हजार कामगार काम करू शकतील अशी सोय या कंपनीने करून दिली आहे.  जगातले सर्वात मोठे ऑफिस म्हणून या कार्यालयाची नवी ओळख निर्माण होत आहे.

कंपनी कार्यालयात जवळपास ३०० पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. एकूण ९७२ लिफ्ट आहेत त्यापैंकी ४९ लिफ्ट अतिवेगाच्या असून त्या प्रतिसेकंद प्रतीमजला असा प्रवास करू शकतात या क्षमतेच्या आहेत.

कंपनीच्या बांधकामासाठी ३० मार्च  २०१६ रोजी सुरुवात झाली होती. एकूण ६८ एकरमध्ये ही कंपनी उभारण्यात आली आहे.  तब्बल ३९ महिने दोन हजार वर्कर्स काम करत होते. १ कोटी ८० लाख तास काम या कार्यालयाच्या उभारणीसाठी लागले.

कंपनीच्या एका स्पेसमध्ये हेलिपड उभारण्यात आला आहे. ६५ फुटबॉलची मैदाने यात बसू शकतात एव्हढी या ऑफिसचे क्षेत्र आहे. हैद्राबादमधील गाची बाहुली येथे हे कार्यालय थाटण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या कार्यालयाच्या बांधकामासाठी लागणारे स्टील हे प्रसिद्ध राफेल टॉवरच्या अडीच पट अधिक आहे. याठिकाणी चोवीस तास कॅन्टीन आहेत. श्रद्धाळू कर्मचाऱ्यांसाठी प्रार्थना कक्ष, मदर्स रूम, शॉवर्स याठिकाणी उपलब्ध आहेत.

याठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला असून याद्वारे जवळपास ८.५ लाख लिटर पाणी प्रतीदिवस शुद्ध केले जाऊ शकतो अशी सोय करण्यात आली आहे.

अमेझॉनच्या ऑफिसची काही दृश्य 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!