Type to search

Breaking News Featured नाशिक ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : आंतरराष्ट्रीय भूल शास्त्र दिन : वैमानिक आणि भूलतज्ञ यांच्या कार्याची सांगड

Share

16 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भूल शास्त्र दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक दिवसच एक वेगळी ओळख घेऊन येतोय.  मोबाईलमुळे जग खूप जवळ आले आहे. संपर्क एकदम सोपा आणि सहज त्याच अनुषंगाने भूलशास्त्र या विषयी नेमकं काय माहीत करून घेतलं पाहिजे आणि काय समजून घेतलं पाहिजे.

एक विमान प्रवास आपण उदाहरण म्हणून घेतला तर विमान प्रवासापूर्वी कोणत्या कंपनीच विमान विमान सेवा कुठून कुठे त्याचे भाडे किती? प्रवास करणारी व्यक्ती कोण? वय काय  तुमच्या सोबत असलेल्या वस्तू काय? विमान कोण चालवणार आहे. विमानात बसल्यावर कोण कोण एअर होस्टेस सेवा देतील.

या सगळ्याची माहिती प्रवाशास असते द्यावी लागतेअगदी तसेच पेशंट ला आजार कोणता  किती दिवसापासून त्या संबंधी तपासणी रिपोर्ट काय आले आहेत ऑपरेशन करणार कोण?

मागे झालेले आजार असतील तर आत्ताच आजार आणि त्यांचे ऑपरेशन करताना परिणाम काय होतील आणि भूल देताना किंवा दिल्या नंतर उदभवू शकणारे प्रसंग ह्या सर्व गोष्टींचा सखोल विचार करून भूल तज्ज्ञ भूल कोणती द्यायची हे ठरवत असतात भूल देण्यापूर्वी ची भूल तज्ज्ञाने केलेली तपासणी अत्यंत मोलाची असते जसा विमानाचा टेक ऑफ महत्वाचा ज्याला भूल तज्ज्ञ इंडक्शन ऑफ अनेस्थेसीआ असे म्हणतात.

तितकच  ठराविक पातळीवर भूल दिलेली कायम सतत राखून पेशंटचे पंचप्राण फुफुसे हृदय मेंदू लिव्हर आणि किडनी या वर भूल तज्ज्ञ अष्टवधानी असल्यागत अत्यंत कसोशीने आपल्या बुद्धी आणि स्किल चा वापर करून पेशंट सुरक्षित ठेवून ऑपरेशन पार पडण्यास अत्यंत महत्वाची जणू वैमानिकाची भूमिका पार पाडतात.

आता विमान प्रवासातील एअर टरबूलन्स जसा कधी कधी समोर उभा ठाकतो. तसेच भूल दिल्यानंतर सुद्धा अचानक काही अडचणी उद्भवू शकतात. ज्या प्रत्येक व्यक्ती आणि त्याचा आजार आणि त्याची प्रकृती नुसार बदलतात, ऑपरेशन संपत आले की विमानाचं लँडिंग  तेव्हा देखील प्रवाशांना सूचना सीट बेल्ट बांधणे मोबाईल बंद करणे या सारख्या सूचना दिल्या जातात, सोबत वैमानिक आता काय करणार आहे हे देखील सांगितलं जातं.

अगदी त्याच प्रमाणे भूल दिलेल्या व्यक्तीला ऑपरेशन संपल्यानंतर पुन्हा पूर्ववत स्थिती म्हणजे शुद्धधीवर आणण्यासाठी पेशंटची स्थिती श्वसन हृदयाची गती किडनी लिव्हर ब्रेन ज्यांना व्हायटल ऑर्गन्स असे म्हणतात, त्यांची उमेदवारी आणि कामाची टक्केवारी विचारात घेऊन पुन्हा पेशंट ला पूर्व स्थितीत आणायचं काम अत्यंत कसोशीने भूल तज्ज्ञ करतात.

मानवी शरीर अत्यंत कॉम्प्लेक्स गुंतागुंतीचे असले तरीही कोणी केव्हा काय काम करायचं आणि एखाद्या सिस्टीम मध्ये बिघाड झाला तर त्याचे शरीरावरील होणारे ऑपरेशन दरम्यानचे परिणाम मोजण्याची अत्यंत अद्ययावत उपकरणे उपलब्ध असली तरीही भूल तज्ज्ञांचा अनुभव स्किल आणि प्रगाढ अभ्यास काय निर्णय घ्यायचा याचे निर्णय घेतो.

अनेक जणांना भूल शास्र हे केवळ एक इंजेक्शन दिल की, संपलं एव्हढीच व्याप्ती माहीत असते  पण ह्या दिलेल्या इंजेक्शन चे पुढील 3 तास फुफुसे किडनी लिव्हर ब्रेन हृदय या वर काय परिणाम होतात आणि त्याचा रिस्पॉन्स कसा मिळत जातोय.

या सगळ्या गोष्टी सांभाळण्यात भूल तज्ज्ञांची अक्षरशःकसोशी लागते  काही वेळा विमानस लँडिंग साठी पार्किंग नसाल तर हवेत तरंगत ठेवतात वैमानिक  तसच अगदी पेशंट भूल दिल्यावर बाहेर आल्यानंतर पेशंटने पूर्ण स्वस्थ असल्याचे सिग्नल दिल्या नंतरच पेशंटला ऑपरेशन थिएटर बाहेर काढले जाते.

पेशंट ऑपरेशन नंतर आय सी यु किंवा पोस्ट ऑप रूममध्ये असताना पेशंट च्या नातेवाईकांनी डॉक्टरने सांगितलेल्या सूचनाचे काटेकोर पालन करणे गरजेचे असते.  या विभागातही पेशंटला स्वस्थ ठेवणे हाच उद्देश असला तरी भूल आणि ऑपरेशनला त्याच शरीर कस आणि काय साथ देते हे म्हत्वाचेच असते.

आता दीर्घ विमान प्रवास नंतर जेट लेग असतो तसाच भूल आणि ऑपरेशनचा ही थकवा आणि व्हाटल ऑर्गन्स ची कार्यक्षमता यावर कमी जास्त परिणाम हा होतोच त्या नुसार पुढील काळजी काय घ्यायची याच्या सूचना दिल्या जातात.

थोडक्यात काय ऑपरेशन च्या घटनेवर भूल ही निवडणूक घेतली की महत्वाचे 5 उमेदवार फुफुसे ब्रेन लिव्हर किडनी हृदय आपली उमेदवारी लढताना मधेच काही अपक्ष अनपेक्षित रिस्पॉन्स ऐनवेळी या स्वरूपात उभे राहिल्यास ऑपरेशन भूल निवडणूक गुंतागुंतीची आणि सोपी न होता अवघड होऊन बसते.

त्यामुळे आपला आजार लपवू नका ऑपरेशन पूर्वी भूल तज्ज्ञाकडून एक तपासणी जरूर करून घ्या कोणती भूल द्यायची हे त्यांना ठरवू द्या,  आपल्या मनातील शंका त्यांना जरूर विचारा  पूर्वी चा भूल घेतली असेल.

डॉ. संज्योति सुखात्मे, नाशिक 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!