उद्यापासून हरकतींवर सुनावणी

0

नगर टाइम्स,

मंत्रालयातील सचिव येणार / दोघांनाच एन्ट्री

अहमदनगर (प्रतिनिधी)- वार्ड रचनेवर नोंदविलेल्या हरकतींची सुनावणी उद्यापासून (दि.12) सुरू होणार आहे. मंत्रालयातील वित्त विभागाचे सचिव राजीवकुमार मित्तल त्यासाठी नगरला येणार आहेत. 24 तारखेला वार्ड रचनेचा ‘भांडाफोड’ झाला असला तरी 27 तारखेला ती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. पाच सप्टेंबरपर्यंत त्यावर हरकती नोंदविण्यात आल्या. नगरमधून आजी-माजी नगरसेवक व नागरिकांनी 85 हरकती दाखल केल्या. गांधीनगर बोल्हेगावला तर फकिरवाडा मुकुंदनगरला जोडा अशी प्रमुख मागणी त्यात आहेत. 15 सप्टेंबरपर्यंत हरकतीवर सुनावणी घेण्याचे मुदत आयोगाने घालून दिली आहे. त्याच्या सुनावणीसाठी वित्त विभागाचे सचिव राजीवकुमार हे नगरला येणार आहेत. शासकीय विश्रामगृहावर ही सुनावणी घेतली जाणार आहे. हरकतदार अनेक असतील त्याठिकाणच्या केवळ दोन जणांचा व्यक्तींनाच प्रवेश मिळेल.

LEAVE A REPLY

*