#WomenBoycottTwitter : अनेक महिलांनी एका दिवसासाठी ट्विटर सोडले, ‘त्या’ प्रकारावर ट्विटरने दिलं स्पष्टीकरण!

0

अनेक लोक आपली मतं मांडण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. याचंच उदाहरण शुक्रवारी सकाळपासून पाहायला मिळतं आहे.

शुक्रवारी ट्विटरवर  #WomenBoycottTwitter ट्रेडिंग आहे. दुनियेतील अनेक महिला याचं समर्थन करत एका दिवसासाठी ट्विटर सोडत आहेत.

महिला ट्विटरवर एक दिवसासाठी बहिष्कार टाकत असल्याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रोज मॅकगॉवन हिने ट्विटरवर हॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक हार्वे विंस्टन विरूद्ध अनेक खुलासे केले. हार्वेने 1997 मध्ये माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप अभिनेत्री रोजने केला आहे. निर्माता-दिग्दर्शक हार्वेवर आरोप केल्यानंतर काहीवेळातच ट्विटरने रोज मॅकगॉवनंच अकाऊंट सस्पेंड केलं. रोजचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर महिलांनी त्याला पूर्णपणे विरोध केला. ट्विटर ही सोशल नेटवर्किंग साइट स्त्री-पुरूषांमध्ये भेदभाव करते, असा आरोप महिलांनी केला. महिलेने पुरूषाविरोधात आवाज उठवला तर तिचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उघडउघड धमकी देतात तेव्हा त्यांच्या अकाऊंटवर ट्विटरकरून कारवाई का करण्यात येत नाही? असा सवालही महिलांनी उपस्थित केला. 

ट्विटरवर महिलांच्या सुरू असलेल्या आक्रोशानंतर ट्विटरकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. रोजने त्यांचा खासगी मोबाइल नंबर ट्विट केल्याने त्यांचं अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं. खासगी नंबर ट्विटवर टाकणं हे ट्विटकच्या गाईडलाईनचं उल्लंघन असून, ते ट्विट डिलीट केल्यानंतर पुन्हा त्यांचं अकाऊंट सुरू करण्यात आल्याचं ट्विटरने सांगितलं. आपलं खरं मत मांडणाऱ्या प्रत्येकासोबत ट्विटर असल्याचं ट्विटरने आपल्या स्पष्टीकरणात म्हंटलं आहे. पण ट्विटरच्या या माफीनाम्याचा काहीही उपयोग झाला नसून अनेकांनी ट्विटर अकाऊंट एका दिवसासाठी डिलीट केली आहेत.

 

LEAVE A REPLY

*