…आणि म्हणून नाशिकच्या महिलेने वाहतूक पोलिसाच्या कानशिलात लगावली

0
नाशिक | वाहतुक नियमाचा भंग केल्याने दंड मागणार्‍या पोलीस कर्मचार्‍यास महिलेने मारहाण केल्याची घटना आज सीबीएस सिग्नल येथे घडला. या प्रकरणी महिला व तीच्या पतीविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरसे दाम्पत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर पोलिसांनी त्यांना थांबवले. यावेळी पोलिसांशी अरेरावीदेखील झाली. याचवेळी उज्वला बोरसे यांनी पोलीस कर्मचारी गायकवाड यांचा हात पकडला. गायकवाड यांनी सावधानता बाळगत घडत असणाऱ्या प्रकाराचे आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग करण्यास सुरूवात केली.

याचा राग आल्याने उज्वला बोरसे या महिलेने गायकवाड यांच्या गालावर चापट मारली. अखेर इतर कर्मचार्‍यांनी धाव घेत गायकवाड यांची सुटका केली.

उज्वला कैलास बोरसे (25) व पती कैलास मल्हार बोरसे (26) रा. मोरेमळा, नवीन नाशिक अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहतूक पोलीस युवराज गोपीचंद गायकवाड हे आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास आपले कर्तव्य करत होते.

यावेळी मोडक सिग्नल येथे उजवीकडे वळण नसताना संशयीत उज्वला व कैलास बोरसे यांनी शालिमारच्या दिशेने जाण्यासाठी उजवीकडे वळण घेतले.

गायकवाड यांनी त्यांची मोटारसायकल क्रमांक एमएच 15 ईएन 0981 ही थांबवली. वाहतुक नियमाचा भंग केल्यामुळे गायकवाड यांनी बोरसे यांच्याकडे दंडाची मागणी केली.

पोलीस हवालदार गायकवाड यांच्या तक्रारीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात बोरसे दाम्पत्यावर सरकारी कामात अडथळा व मोटारवाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे करत आहेत.

LEAVE A REPLY

*