Thursday, May 2, 2024
Homeनगरविवाहित महिलेवर दीराकडून अत्याचार

विवाहित महिलेवर दीराकडून अत्याचार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील एका उपनगरामध्ये राहणार्‍या 34 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या दीराने अत्याचार केला. तर पतीने ही वारंवार अनैसर्गिक संभोग केला असल्याची फिर्याद पिडीत महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून तीचा पती व दिराविरोधात अत्याचार, अनैसर्गिक अत्याचार आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. जानेवारी 2021 पासून हा प्रकार सुरू असल्याचे पिडीताचे म्हणणे आहे. नगर शहरातील एका उपनगरात आपल्या पतीसह पिडीत महिला राहते.

त्या महिलेच्या इच्छेविरोधात पतीने तिचा वारंवार अनैर्गिक संभोग केला. तसेच दिराने ही अत्याचार केला असल्याचे पिडीताने फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघां भावाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या