‘शबरीमला’च्या पायथ्याशी तणाव, 11 महिलांकडून मंदिर प्रवेशाचा प्रयत्न

0

केरळ – केरळच्या शबरीमला मंदिर परिसरात महिलांच्या प्रवेशावरुन पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती आहे. रविवारी सकाळी 50 वर्षांहून कमी वय असलेल्या 11 महिला दर्शनासाठी आल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. मंदिर प्रवेशासाठी या महिलांनी मदुराईमधून पायी यात्रा सुरू केली होती. जंगल मार्गाद्वारे आल्यानंतर मंदिरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर विरोध करणाऱ्या भाविकांनी मज्जाव केल्याने त्यांना तेथेच थांबावं लागलं. भाविकांकडून जोरदार विरोध प्रदर्शन सुरू असून मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. विरोध करणाऱ्या काही भाविकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, मनीथी संघटनेचे सदस्य सध्या पोलिसांशी चर्चा करत आहेत. या संघटनेतील एका महिलेने सांगितले, की ‘पंबाचे स्थानिक पुजारी आम्हाला सहकार्य करायला तसेच परंपरेनुसार पूजा करू द्यायला तयार नाहीत. जोपर्यंत आम्हाला अयप्पांचे दर्शन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवणार. आम्हीही भक्त आहोत आणि दर्शन घेतल्याशिवाय आम्ही या तीर्थक्षेत्रातून परत जाणार नाही. सुरक्षेच्या कारणांमुळे पोलिसांनी आम्हाला मागे जाण्यास सांगितले, परंतु आम्ही जाणार नाही’.

मंदिरात ३० महिला प्रवेश करणार असल्याची माहिती पोलिसांना अगोदरच मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी मंदिर परिसराजवळ कडेकोड सुरक्षा ठेवली आहे. दरम्यान, शबरीमला मंदिरात महिलांचे प्रवेश करण्याचे प्रयत्न लक्षात घेता २७ डिसेंबरपर्यंत मंदिरात महिला प्रवेश बंदीचे आदेश वाढविण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*