धोडंबेत स्वाईन फ्ल्यूने महिलेचा मृत्यू

0
धोडंबे | धोडंबे ता. चांदवड येथे स्वाईन फ्ल्यूने नामदेव मोहिते यांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेला महिना उलटला नसतांना सोमवार दि.७ रोजी रात्री स्वाईन फ्ल्यू सदृश्य आजाराने येथील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
येथील सुलोचना दत्तात्रेय रकिबे वय ४२ ह्या मागील आठवड्यात शिर्डी येथे पायी दिंडीत जाऊन आल्यानंतर काहीसे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना धोडंबे, वडाळीभोई तसेच पिंपळगाव बसवंत येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र स्वाईन फ्ल्यू सदृश्य आजाराचे लक्षणे जाणवल्याने खाजगी डॉक्टरांनी त्यांना नाशिक जिल्हा रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. जिल्हा रूग्णालयात सुलोचना यांच्यावर गेले तीन दिवस उपचार सुरू होते.
मात्र, सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. दरम्यान स्वाईन फ्ल्यू ने महिनाभरात दोन  नागरिकांचा जीव घेतल्याने धोडंबे परीसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

LEAVE A REPLY

*