गणुर येथील विवाहितेचा स्वाईन फ्लूने मृत्यू

0

चांदवड : तालुक्यातील गणुर येथील 26 वर्षीय विवाहितेचा स्वाईन फ्लू ने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (दि. ८) रोजी दुपारी घडली.

गणुर ता. चांदवड येथील मंगला संतोष सवंद्रे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तीन दिवसांपूर्वी चांदवड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.

तेथे दोन दिवसांच्या उपचारांनंतर स्वाईन फ्लू ची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मात्र प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर गेल्याने रुग्णालयातच आज दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मुलगा, सात वर्षीय मुलगी, पती असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*