आव्हानांचा सामना करण्याची महिलांमध्ये उपजत क्षमता – डॉ सिमा राव

0
नााशिक | भारतीय लष्कर सीमेबरोबरच अंतर्गत सुरक्षा देखील विविध परिस्थितींमध्ये चोखपणे बजावत आहे. संरक्षण दलात महिलांचा समावेश हा गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पुरूषांपेक्षा महिलांची शारिरीकदृष्टया सक्षम असतात. लष्कारातील कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्यास महिला सज्ज असल्याचे प्रतिपादन पहिल्या महिला कमांडो प्रशिक्षक डॉ.सीमा राव यांनी केले.

पोलिस पब्लीक पार्टनश्रशिपच्या संयुक्त विद्यामाने विश्वास लॉन्स येथे आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमाप्रसंगी राव बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या,कमांडो होण्यासाठी महिलांमध्ये शारिरीक क्षमता असणे महत्वाचे आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतांना त्यांच्यापुढे अनेक आव्हाने असतात.

जागतिक पातळीवर राष्ट्र संरक्षणाच्या बदललेल्या भूमिकांमध्ये महिलांचा सहभाग महत्वाचा भाग ठरत आहे. लष्करी प्रशिक्षण केवळ पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणार्‍या या क्षेत्रात महिलांनी देखील चांगलीत कसब दाखविली आहे. आपल्या आत्मविश्वासाच्या व शारीरिक क्षमतेच्या जोरावर लष्करातील महिलांनी विविध आव्हाने पेलली आहे.

समाजातील इतर महिलांनी देखील त्यांचा आदर्श बाळगणे गरजेचे असून भविष्याचा वेध घेवून आपली ध्येय गाठण्यासाठी महिलांनी सतर्कता दाखविली पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रथम त्यांनी त्यांच्या आयुष्यावरील एक फिल्म उपस्थितांना दाखविली. त्यानंतर वैशाली बालाजीवाले यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनातील अनुभव, प्रशिक्षण कार्यक्रम, महिलासक्षमीकरण यावर भाष्य केले.

कार्यक्रमाप्रसंगी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, विश्वास बँकेचे संचालक विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार वैशाली बालाजीवाले यांनी केले.

LEAVE A REPLY

*