Friday, May 3, 2024
Homeनगरएका महिलेला छेडले, दुसरीला बसमधून ढकलले

एका महिलेला छेडले, दुसरीला बसमधून ढकलले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बसमध्ये एका महिलेची छेड काढली तर जाब विचारणार्‍या दुसर्‍या महिलेला मारहाण करत बसमधून खाली ढकल्याची घटना मंगळवारी सायंकाळी माळीवाडा बस स्थानकावर घडली. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी उमाजी चौरे (रा. गोरेगाव ता. पारनेर) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंग, मारहाण कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादी महिला रूईछत्तीशी ते नगर बसमधून माळीवाडा बस स्थानक येथे आल्या होत्या. त्या बसमधून खाली उतरत असताना शिवाजी चौरे याने त्यांना छेडले. त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. दरम्यान शिवाजी चौरे हा नगर-पारनेर बसमधून जात असताना त्याला दुसर्‍या एका महिलेने सदर घटनेबाबत जाब विचारला असता त्याने त्या महिलेला मारहाण करून बसच्या खाली ढकलून दिले. यामुळे महिला जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अधिक तपास महिला पोलीस नाईक कविता गडाख करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या