Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच क्रीडा मुख्य बातम्या

Video : ‘वुमन ऑफ दी मॅच’ ठरल्या ८७ वर्षीय आजीबाई; आनंद महिंद्रा यांनी दिली ‘ही’ ऑफर

Share

देशदूत डिजिटल विशेष

भारत आणि बांगलादेश यांच्या क्रिकेट सामन्यादरम्यान कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना मैदानावर उपस्थित असलेल्या दोन्ही देशांच्या खेळाडूंसह इतर सर्वच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले ते त्या आजीबाईंनी. ज्यांचे वयवर्ष ८७ आहे, आणि त्या भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानात हजर होत्या.

विशेष म्हणजे, भारतीय कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी या आजीची भेट घेतली. आजीने त्यांना शुभेच्छा देत नातवाप्रमाणे गोंजारले. या घटनेचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले. तेव्हा, आजी या दोघांशी काय बोलली असावी. तिने काय सांगितले असावे असा प्रश्न उपस्थित क्रिकेट रसिकांना पडला.

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या इंग्लंडमध्ये सध्या विश्‍वचषकाचे सामने सुरू असून बांगलादेश आणि भारतादरम्यान झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पहिल्या चेंडूपासून रोहित शर्मा शो ही भारतीय खेळाडू यांना चिअरप करताना एक आजीबाई स्क्रीनवर सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या.

त्या भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर मैदानात मोठ्या उत्साहात वावरत होत्या. अक्षरश: त्यांनी ट्रंपेट देखील वाजवत भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला.

भारताने हा सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहलीसह अनेक भारतीय खेळाडूंनी या आजीबाईंची भेट घेतली. भारताने आजचा सामना जिंकून उपांत्यफेरीत दिमाखात प्रवेश केला. मात्र, या सामन्याची वूमन ऑफ दी मॅच या आजीबाईच होत्या हे सर्वांना दाखवून दिले.

हे सर्व झाल्यानंतर महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी याबाबत ट्विटरवर ट्वीट करत म्हटले की, मी क्रिकेट बघितले नाही, मात्र आजीबाईच्या उत्साहाला दाद द्यावी लागेल. त्यांच्यामुळे क्रिकेटबाबतचे प्रेम अधिक वाढले आहे.

त्यानंतर एका युजरने आनंद महिंद्रा यांना सांगितले की, तुम्ही या आजीबाईला ब्रांड अम्बेसिडर का नाही बनवावे? त्यावर खुश होत आनंद महिंद्रा यांनी या आजीबाईचा शोध घ्या…यापुढील भारताच्या सामन्याची सर्व तिकिटे मी स्वत: मोफत करेल अशी ऑफर देऊ केली.

एकून प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या प्रकारे देशासाठी योगदान देत असतो. आजचीही घटना अशीच आहे त्यामुळे सर्वत्र या आजीबाईचीच चर्चा सुरु आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!