Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

लखमापूर : बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

Share

लखमापूर | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. येथील हनुमान वाडी शिवारात ही घटना घडली.  मंगला बाळासाहेब दळवी असे या महिलेचे नाव असून महिलेला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक महिती अशी की, महिला सकाळपासून शेतात काम करत होती. शेजारच्या शेतातून अचानक आलेल्या बिबट्याने महिलेला लक्ष्य करत हल्ला केला.

महिलेच्या मानेवर चावा घेतल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु असल्याचे समजते.

गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी बिबट्याचा संचार आढळून येत असून नियमित संचार कुठे ना कुठे दिसून येत आहे. परिसरात गेल्या काही दिवसांत बिबट्याच्या संख्येत मोठी वाढ झाल्याची माहिती मिळते आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!