Friday, May 3, 2024
Homeनगरमहिलेचे एक तोळ्याचे गंठण लांबविले

महिलेचे एक तोळ्याचे गंठण लांबविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घराचा दरवाजा लोटून किराणा आणण्यासाठी गेलेल्या महिलेचे एक तोळ्याचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्यांनी घरातून लंपास केले. शनिवारी दुपारी मुन्सिपल कॉलनी, गणपती मंदिराजवळ, सिध्दार्थनगर येथे ही घटना घडली. या प्रकरणी सायली गौरव वैराळ (वय 22 रा. सिध्दार्थनगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादी यांचे पती शनिवारी ड्युटीवर गेले होते. फिर्यादी घरी एकट्याच होत्या. त्यांना किराणा सामानाची आवश्यकता असल्याने त्यांनी घराचा दरवाजा लोटून जवळच असलेल्या किराणा दुकानात गेल्या. त्या किराणा सामान घेवुन 1.20 वाजता घरी आल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला.

त्यांनी घरात पाहणी केली असता त्यांना घरातील सामानाची उचकापाचक झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी देवघरातील भिंतीवर ठेवलेले सोन्याचे गंठण पाहिले असता ते मिळून आले नाही. चोरी झाल्याचे त्यांच्या लक्ष्यात येताच त्यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या