Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : सप्तश्रृंगी गड : शितकड्यावरून पत्नीला लोटले; पत्नीचा मृत्यू, पती ताब्यात

Share

सप्तश्रृंगी गड | वार्ताहर 

सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी आलेल्या पतीने पत्नीला सतीच्या कडेवरून (शितकडा) लोटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेश  येथून आलेल्या नवविवाहित दाम्पत्य काल (दि. १४) रोजी येथे सप्तशृंगीच्य दर्शनासाठी आले होते. याठिकाणी मुक्कामी थांबण्यासाठी त्यांनी येथील एक रूम भाड्याने घेतला होता.

सकाळी उठून त्यांनी गड परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन केले. अनेक वस्तूही खरेदी केल्या. तसेच सप्तश्रृंगीचे दर्शनही घेतले. हे नवदाम्पत्य तलावाकडे फिरण्यासाठी गेले होते. त्यांनी येथील खासगी फोटोग्राफरकडून फोटोही काढून घेतले.

त्यानंतर अचानक येथील सतीचा कडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कड्यानजीक हे दोघेही गेले असतानाच पतीने पत्नीला कड्यावरून खाली ढकलून दिल्याची माहिती येथील पर्यटकांनी दिली.

या घटनेत पत्नी कविता काळे हिचा मृत्यू झाला आहे. मयत कविता ह्या मध्यप्रदेशातून पती बाबूलाल काळे (रा. मुरादपूर जिल्हा गुन्हा, (मध्यप्रदेश) याच्यासोबत आल्या होते.

दरम्यान, संशयित बाबूलाल याने पत्नीला ढकलून दिल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पर्यटकांनी त्यास पकडून पोलिसाच्या स्वाधीन केले. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस कर्मचारी सचिन राऊत, योगेश गवळी, नांदुरी पोलीस कर्मचारी वर्ग तसेच संदीप बेनके, कळमकर या पोलीस मित्रांची उपस्थिती होती.

(व्हिडीओ / फोटो : इम्रान शाहा)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!