Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

येवला : मनमाड शिर्डी मार्गावर अपघात; धुळे जिल्ह्यातील साईभक्त महिलेचा मृत्यू

Share

विखरणी : वार्ताहर

मनमाड-शिर्डी मार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून आज सकाळी तांदुळवाडी फाट्यानजीक साईबाबा पालखी सोहळ्यात दिंडीत पायी जाणाऱ्या वारकरी महिलेला टॅक्सीची जबर धडक बसल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.

धुळे जिल्ह्यातील भाविक गुरुपौर्णिमा सोहळ्यासाठी शिर्डी येथे दिंडीत पायी जात असताना यातील सुरेखा बाळू कुलकर्णी नामक महिला काळी-पिवळी वाहनाची जबर धडक बसल्याने या वारकरी महिलेचे जागीच मृत्यू झाला.

याच मार्गावर काल वारकऱ्यांच्या वाहनाचा अपघात होऊन 8 वारकरी जखमी झाल्याची घटना ताजी असताना हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!