Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

गर्दीचा उच्चांक गाठलेल्या डोंबिवली रेल्वे स्टेशनवर ‘ति’ने दिला गोंडस बाळाला जन्म

Share

मुंबई | प्रतिनिधी 

पावसाच्या आगमनाने ठप्प झालेली देशाची आर्थिक राजधानी मुंबई आज सकाळपासून हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली एका महिलेला डोंबिवली रेल्वे स्टेशनवर प्रसूतीकळा येऊ लागल्या. शेजारीच असलेल्या एका हॉस्पिटलच्या स्टाफने या महिलेला रेल्वेस्टेशनवर सुरक्षित जागेवर नेले.  तिची याठिकाणी प्रसूती करण्यात आली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. दोघांचीही प्रकृती चांगली असलायची माहिती संबंधित स्टाफकडून देण्यात आली.

वेळ सकाळी सातची. पावसामुळे ठप्प झालेल्या मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर जीवनवाहिनी असलेल्या लोकलही सकाळपासून रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे धावत होत्या.

डोंबिवली रेल्वे स्टेशनवर जस्मिन शब्बीर शेख (वय २९) ही महिला पतीसोबत दवाखान्यात जायला निघाली होती. अचानक तिला प्रसूतीकळा येऊ लागल्या. शेजारीच मुंबईतील एका नामांकित दवाखान्याचा स्टाफ लोकलची वाट बघत होता.

त्यांनी कुठलीही पर्वा न करता या महिलेला सुरक्षित जागेवर नेले. त्यानंतर या महिलेची रेल्वे स्थानकातच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. महिलेची प्रसूती यशस्वी झाली, महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला.

या महिलेला शेजारील सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले असल्याचे वन रुपी हॉस्पिटलच्या स्टाफकडून माहिती देण्यात आली. महिलेसोबत तिचे पतीही होते. तसेच रेल्वे पोलिसांनी यावेळी चोखपणे कर्तव्य बजावत महिलेले सुरक्षित ठिकाणी हलविण्यास मदत केली.

जाता जाता महिलेच्या कुटुंबीयांनी रेल्वे पोलीस आणि संबंधित हॉस्पिटलच्या स्टाफचे आभार मानले. आज सकाळपासून या घटनेचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत होते. आमची मुंबई थांबली असली तरी एकमेकांची मदत करून माणुसकी दाखवण्यास आम्ही सदैव तत्पर असतो असे यानिमित्ताने मुंबईकरांनी दाखवून दिले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!