‘वोक्हार्ट’मध्ये आजपासून किडनी तपासणी शिबिर

0

नाशिक । जागतिक किडनी दिनाचे औचित्य साधून वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये 14 ते 30 मार्च दरम्यान किडनी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हॉस्पिटलतर्फे किडनीरोग निदानासाठी लागणार्‍या महत्त्वाच्या चाचण्याचे एक विशेष पॅकेज तयांर करण्यात आले असून, त्यामध्ये कम्प्लिट ब्लड काउंट, युरीन रुटीन, युरिया, क्रिऍटिनिन, रँडम ब्लड शुगर, सिरम युरिक अ‍ॅसिड, सिरम कॅल्शियम, सोनोग्राफी या सर्व चाचण्या अगदी सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे.

तसेच किडनीरोग तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा मिळणार आहे. या पॅकेजचा लाभ केवळे 799 रु. मध्ये घेता येणार आहे. किडनीरोगांची लक्षणे आणि रुग्णांची वाढती संख्या बघता, यावर्षी ‘वोक्हार्ट’ ने विशेष पॅकेज जाहीर केले.शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

*