गांजा वापरामुळे अंजिठा-वेरुळची शिल्प चिरकाल : डॉ. सरदेसाई

0
नाशिक | प्रतिनिधी – औरंगाबादेतील अजिंठा वेरूळ येथील लेण्याच्या निर्माणात गांजाचा वापर केला गेला, त्यामुळे त्याचे अस्तित्त्व आजही टिकून आहे. गांजा वनस्पती उष्णतारोधक,आद्रर्ता शोषक आहे त्यामुळे ही शिल्प आजही चांगल्या अवस्थेमध्ये आहेत अशी माहिती पुणे विद्यापीठच्या वनस्पतीशास्र विभागाचे प्राध्यापक डॉ. मिलींद सरदेसाई यांनी दिली.

केटीएचएम महाविद्यालय आयोजित ‘जैवविविधता संवर्धन सद्यस्थिती आणि भविष्यकालीन दृष्टीकोन’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्रात डॉ. सरदेसाई बोलत होते. व्यासपीठावर सुरतचे प्रा. एम. एच. पराबिया, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा, डॉ. एम. डी. सोनवणे, प्रा. डॉ. व्ही. बी. कदम यांची उपस्थिती होती.

आपल्या देशामध्ये ९हजार ५०० औषधी वनस्पती आहेत असे सांगत औरंगाबादच्या विवेकानंद कॉलेजचे प्रा. पी. पी. शर्मा यांनी २०० वनस्पती या औषध निर्मितीसाठी ९३ टक्क्यांपर्यंत बाहेरील देशांमध्ये निर्यात केल्या जातात अशी माहिती दिली.

शासनस्तरावर वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न होत असून समाजानेही त्यासाठी वाटा उचलायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रा माधव माळी यांनी निसर्गाच्या र्‍हासावर चिंता व्यक्त करुन बर्‍याचशा औषधी वनस्पती अतिवापरामुळे लुप्त होत आहे, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्व प्राणी,वनस्पती,जीवाणू अबाधित राहील्या पाहीजेत असे सांगितले.

पर्यावरणाचा समतोल ढासळण्यास मनुष्य जबाबदार आहे असे नमूद करुन त्यांनी जैवविविधतेचा र्‍हास मानवाच्या हस्तक्षेपामुळे हल्ली वेगाने होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली.

यावेळी प्रा. एस. व्ही. देवरे, प्रा. डॉ. एम. जी. भागवत, प्रा. एस. बी. जाधव, प्रा. एस. सी. बिडवे, प्रा. आर. सी. गायखे, प्रा. एन. एस. रायते, प्रा. बी. डी. भोकनळ यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा.डॉ.ज्ञानेश्वर खांडबहाले तर आभार प्रा.डॉ.व्ही.बी.सोनवणे,यांनी मानले.

LEAVE A REPLY

*