Type to search

हरसुलच्या के.बी.एच विद्यालयाचा ‘बिनतारी माऊस’ जपानला

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक ब्लॉग मुख्य बातम्या

हरसुलच्या के.बी.एच विद्यालयाचा ‘बिनतारी माऊस’ जपानला

Share

वेळुंजे | सुनिल बोडके

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर पात्र ठरलेल्या ‘बिनतारी माउस’ या प्रकल्पाची आंतरराष्ट्रीय इंस्पायर अवार्ड स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामुळे हे प्रकल्प जपानला सादर होणार असून या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आदिवासी सेवा समिती संचलित, कर्मवीर भाऊसाहेब हिरे माध्यमिक व उच्य माध्यामिक विद्यालयात शिक्षण घेत असलेला मो.नाईक अन्सार नाईकवाडी या विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर ‘बिनतारी माउस’ प्रकल्प सादर करून घवघवीत यश मिळविले आहे.

या यशाबद्दल जपान येथील साकुर येथे दि.२५ मे ते ३१ मे च्या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय इंस्पायर अवार्ड स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

त्याला विज्ञान शिक्षक पी.बी.कापडणीस यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या घवघवीत यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य पी. टी. जाधव यांनी त्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार केला आहे.

याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी प्रशांत हिरे,समनव्यक अपूर्व हिरे, उपमुख्याध्यापक पी.एस. महाले,पर्यवेक्षक कोठावदे आदींनी अभिनंदन केले आहे.

विद्यार्थ्याने जिद्द, चिकाटी आणि मेहनत अंगिकरून विज्ञान शिक्षकाचे मार्गदर्शन वेळोवेळी घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांतील सुप्तगुण आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यास मदत झाली असल्याने विद्यालयाचे नाव मोठे होईल.

प्राचार्य पी.टी. जाधव, केबी.एस. विद्यालय हरसूल

विद्यालयातील शिक्षकांचे मिळालेले मार्गदर्शन या बिनतारी माउस प्रकल्पास मोठे योगदान देणारे आहे.ग्रामीण भागातील प्रकल्प जपान सारख्या ठिकाणी सादर करण्याची जी संधी आहे.तिचे जरूर सोने करीन.

मो.अन्सार नाईकवाडी, प्रकल्प सादर करणारा विद्यार्थी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!