Type to search

Featured मुख्य बातम्या हिट-चाट

Video : वायरलेस प्रेमाची गोष्ट ‘ट्रिपलसीट’ चा ट्रेलर लाँच

Share

‘गोष्ट वायरलेस प्रेमाची’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘ट्रिपल सीट’ची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता लागून आहे. हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबरला रिलीज होत आहे.

नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माता स्वप्नील मुनोत, सहाय्यक निर्माता पुष्कर श्रीपाद तांबोळी, कथा, पटकथा व संवादलेखक आणि क्रीएटिव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित दळवी, दिग्दर्शक संकेत पावसे आहेत.

अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एन्टरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनीने ‘ट्रिपल सीट’ची निर्मिती केली आहे.  चित्रपटात कृष्णा म्हणजेच अंकुश चौधरी आपल्या तीन मित्रांसह कुणाच्या तरी घरात डोकावताना दिसत आहे.

तसेच त्याच्या मोबाईलवर शिवानी सुर्वे अर्थात मीराचा मिसकॉल येतो. ती नेमकी कोण आहे हे त्याला माहीत नाही, मात्र त्यांच्यात मिसकॉलवाली मैत्री होते.

दरम्यान, ट्रेलरमध्ये पल्लवी पाटील म्हणजेच वृंदाची एन्ट्री होते. कृष्णा आणि वृंदा एकमेकांना कधीच सोडून न जाण्याचे वचन देताना दिसतात.

शिवाय, प्रविण विठ्ठल तरडे इन्स्पेक्टर दिवानेच्या भूमिकेत आहेत. त्यांची व्यक्तीरेखा कृष्णाच्या आयुष्यातील गुंता सोडवतात की, वाढवतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ट्रेलरच्या शेवटी अंकुश एका मुलीच्या हातात अंगठी घालताना दिसतो, हा हात नेमका कुणाचा आहे? हे दाखविण्यात आलेले नाही. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.

‘ट्रिपल सीट’ या चित्रपटात अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील यांच्यासह प्रविण विठ्ठल तरडे, शिल्पा ठाकरे, राकेश बेदी, विद्याधर जोशी, वैभव मांगले, योगेश शिरसाट, स्वप्नील मुनोत, प्रकाश धोत्रे, अभिजीत झुंजारराव, प्रसाद बेडेकर, पूनम पाटील, शोभा दांडगे, राहुल नेवाळे यांच्या भूमिका आहेत.

‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाला अविनाश – विश्वजित यांचे संगीत लाभले. गुरु ठाकूर, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, विश्वजित जोशी यांची गीते आहेत. हरमन कौर आणि रोहित राऊत यांच्या आवाजातील ‘नाते हे कोणते’ बेला शेंडे यांच्या ‘रोज वाटे’ या दोन्ही गीतांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.  तर स्वप्नील बांदोडकरच्या आवाजातील एक गाणे लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!