हिवाळी क्रीडा स्पर्धांत कळवण प्रकल्पातील आश्रमशाळा उपविजेत्या

हिवाळी क्रीडा स्पर्धांत कळवण प्रकल्पातील आश्रमशाळा उपविजेत्या

नाशिक | प्रतिनिधी 

आदिवासी विकास  विभागातर्फे अमरावती येथे राज्यस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेत कळवण प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा देवपूरपाडा पांढरून आणि मेशी यांनी 14 वर्ष वयोगटातील मुलांचे प्रतिनिधित्व करत नागपूर-नाशिक या सामन्यात चुरशीच्या लढतीत द्वितीय क्रमांक मिळवला.

विजेत्या संघांना आदिवासी विकास मंत्री नितीन राऊत, सचिव आदिवासी विकास विभाग मनीषा वर्मा,  नाशिक विभाग आयुक्त किरण कुलकर्णी  यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

सदर खेळाडूंना प्रकल्पधिकारी पंकज आशिया, शाळेचे मुख्याध्यापक व्ही, जी गडाख, अरुण निकम, व्ही, पी, पवार,  क्रीडाशिक्षक शिंदे , विशाल पाटील, संदीप देवरे, किरण बागुल, प्रीतम शिरसाठ तसेच अधीक्षक, शिक्षक, शिक्षेकतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com