शहरातील मद्यविक्री पुन्हा सुरू होणार

0
महामार्गांच्या 500 मीटर अंतरातील बिअर बार आणि दारुची दुकाने जर महापालिकेच्या अखत्यारित येत असतील, तर यापुढे त्यांच्यावर दारुबंदी नसेल असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

या निर्णयामुळे महापालिका क्षेत्रातील महामार्गांलगतची परवानाधारक दुकाने पुन्हा सुरु होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मद्यप्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी ठरू शकते.

महामार्गावर होणारे अपघात आणि त्यामधील मृत्यूचे वाढते अपघात लक्षात घेता, सुप्रीम कोर्टाने डिसेंबर 2015 मध्ये राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या आणि 500 मीटर परिघातल्या दारुच्या दुकानांवर बंदी घालण्यात आली होती. आता या आदेशात सुधारणा करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*