Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

मावळत्याचा नव्हे उगवत्याचा विचार : शरद पवार

Share
शरद पवार शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर Latest News Nashik Sharad Pawar Visits Nashik for Vintage 2020

अहमदनगर | प्रतिनिधी

जे गेलेत त्यांचा विचार करायचा नाही, उगवत्याचा विचार करायचा. ज्यांनी लफडी केली, म्हणून ईडी सुरू झाली. महाराष्ट्राला योग्य दिशा देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन नवीन नेतृत्व तयार करायचे असल्याचे सांगत मावळत्याचा नव्हे तर उगवत्याचा इतिहास पाहण्याच्या विचाराचे आपण असल्याचे शरद पवार यांनी येथे सांगितले.

नगर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. भाजप सरकारने कर्जमाफी केली, मात्र ती सरसकट नाही. सत्ताधार्‍यांची हाताला काम देण्याची जबाबदारी असते. मात्र, राज्यात कोणतेच नवीन उद्योग आले नाही. शंभर गिरण्या बंद पडल्या, कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

पुरग्रस्तांची हवाई पाहणी करणार्‍या फडणवीसांनी त्यांना धीर दिला नाही. असे सांगत त्यांच्या नागपूरात गुन्हेगारी वाढल्याकडे पवारांनी लक्ष वेधले.

दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटलांनी डान्सबार बंद केले. भाजप सरकारने महाराष्ट्राचे प्रतिक असलेल्या किल्ल्यांवर बार आणि छमछम सुरू करण्याचे धोरण आखल्याची टिका पवार यांनी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!