Thursday, May 2, 2024
Homeअग्रलेख‘नीट’ घोटाळेबाज भारताला विश्वगुरू बनवतील?

‘नीट’ घोटाळेबाज भारताला विश्वगुरू बनवतील?

वैद्यकीय महाविद्यालयातील (Medical College) प्रवेशासाठी ‘नीट’ (Neet) परीक्षा घेतली जाते. या वर्षीची परीक्षा नुकतीच पार पडली. पण यंदाची परीक्षा फक्त नावातच मनीटफ होती. ही परीक्षा(Examination) घोटाळे (scams) आणि भ्रष्टाचाराच्या (corruption) आरोपामुळे गाजत आहे. मूळ विद्यार्थ्यांच्या नावावर भलत्यांनीच परीक्षा दिली. नागपूरमधील काही विद्यार्थ्यांचे बनावट आधार कार्ड बनवून त्यांना मनीटफसाठी दिल्लीतील परीक्षा केंद्र मिळवून देण्यात आले होते असेही माध्यमात प्रसिद्ध झाले आहे.

सीबीआय अधिकार्‍यांच्या पथकाने नागपूरमध्ये काही ठिकाणी चौकशी केली असून या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. यात खासगी क्लासेसचा हात असावा असा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मगोपनीय पद्धतीने तपास सुरू आहे.

- Advertisement -

तपास पूर्ण होताच योग्य ती माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात येईलफ असे सीबीआयच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी माध्यमांना सांगितले. ही परीक्षा होण्याच्या एक दिवस आधी परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरु झाली होती. वाराणसीमध्येही बनावट विद्यार्थ्याचे प्रकरण उघडकीस आले. बुलढाण्यातील एका केंद्रावर असाच एक प्रकार घडला. परीक्षा संपल्यावरही उत्तरपत्रिका केंद्राबाहेर एका विद्यार्थ्याकडे आढळली.

ही उत्तरपत्रिका परत देत असतानांचा प्रकार तिथे असलेल्या एका कॅमेर्‍यात चित्रित झाला आहे. भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे लोण कुठपर्यंत पसरले आहे याचे हे निदर्शक आहे. हे प्रकार यावर्षी उघड झाले. तथापि याअगोदर अशा गैरप्रकारांचा अवलंब करून किती डॉक्टर तयार झाले असतील? त्या प्रकारचे डॉक्टर व्यवसाय तरी कुठला करतात? ते माणसांवर सुद्धा उपचार करत असतील का? अशा उपचार घेणारांचे देवाने कल्याण करावे असेच आता नीट परीक्षेतील घोटाळे वाचल्यानंतर अनेकांना वाटत असेल का? तसे वाटायलाच हवे, किंबहूना अशा डॉक्टरांकडून उपचार करून घेणार्‍या जीवांचे बरे वाईट होऊ नये अशी प्रार्थना सुद्धा करावीशी वाटली तर ते गैर ठरेल का?

माणसेच नव्हे तर अशा डॉक्टरांच्या उपचारांमुळे जनावरे तरी सुरक्षित राहातील का? भारत भ्रष्टाचारमुक्त असावा असे सामान्य जनतेला वाटणारच! भारतीयांच्या सुदैवाने सध्याचे कारभारी सुद्धा भ्रष्टाचारमुक्तीचा निर्धार सतत जाहीर करत असतात. पण त्या निर्धाराचा किंचितही परिणाम जनतेला का जाणवू नये? एकूणच परिस्थिती ‘नीट’ नाही. केवळ परीक्षेचे नाव नीट ठेवल्याने काय साध्य होणार? त्यासाठी कारभार यंत्रणेतील वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यत सर्वांनीच मनीटफ वागण्याची आवश्यकता नाकारता येईल का?

राज्याराज्यांत सत्त्तांतरे घडवण्यासाठी आमदार खरेदीच्या उद्देशाने करोडोंच्या थैल्या घेऊन सत्तापती पक्षाची नेतेमंडळी फिरत असल्याचा आरोप नुकताच त्याच पक्षाच्या एका आमदाराने केला केला असल्याची माहिती उघड करणारी ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर फिरत आहे. इतक्या विशुद्ध पद्धतीने सत्तेवर येणारा कोणता पक्ष भ्रष्टाचार निर्मूलनाची शुद्ध ग्वाही शुद्ध अंत:करणाने कृतीत आणू शकेल?

विश्वगुरुत्वाच्या स्वप्नाला हे पूरक ठरेल का? व्यायवसायिक शैक्षणिक परीक्षांमधील असे गैरप्रकार थांबले नाही तर विश्वगुरुत्वाच्या स्वप्नांचे मनोहारी मनोरे केवळ स्वप्नरंजनच ठरले तर दोष तरी कुणाला द्यावा? केवळ नीटच नव्हे तर देशातील इंजिनीअरिंग आणि आयआयटीतील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणार्‍या जेईई मेन्सच्या परीक्षेत देखील घोटाळे राष्ट्रीय पातळीवर होतच असतात असे अभिमानाने सांगणारी मंडळी भारतीय शिक्षण क्षेत्राला ललामभूत ठरतील का? विश्वगुरूत्व देखील एखाद्या गुहेतील गुरुत्व ठरवण्याची ताकद या घोटाळ्यामध्ये आणि घोटाळेबाजांमध्ये आहे. यातील ‘नवनग्नता’ कोण दूर करणार?

- Advertisment -

ताज्या बातम्या