…तर तीन तलाकला बंदी घालण्यासाठी कायदा करू : केंद्र सरकार

0

सर्वोच्च न्यायालयाने तीन तलाक प्रथेला घटनाबाह्य ठरविल्यास केंद्र सरकार त्यासंदर्भात नवीन कायदा आणणार असल्याचे केंद्र सरकारचे वकील ॲटर्नी जनरल मुकुंद रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

मुस्लिम समाजातील तीन तलाक, बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला संदर्भात आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून केंद्र सरकारने आपली बाजू मांडली.

ऑल इंडिया मुस्लिम महिला पर्सनल लॉ बोर्डाने यापूर्वीच तीन तलाक पद्धत बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते.

LEAVE A REPLY

*