रस्त्यावरचे सोडा ‘हे’ खड्डे पाहिलेत का ?

0

नाशिक : तुम्ही खड्डे पहिले असतील पण एखाद शहर मावेल इतका खड्डा पाहिलंय कधी. होय या ठिकाणी हे खड्डे पाहावयास मिळतात. मानवनिर्मित आणि नैसर्गिक अशा दोन्ही शक्तींनी तयार केलेले हे ‘होल्स’ आजही आपल्याला चकित करतात.

द ग्रेट ब्लू होल

कॅरेबियन समुद्रात लाईट हाऊसच्या मध्यात द ग्रेट ब्लु होल हा खड्डा आह. काहीजण या खड्डयाला गुहाही म्हणतात. हि गुहा आईस इज (हिमयुग) दरम्यान तयार झाली, असं मानलं जाते. ज्यांना भर समुद्रात पोहण्याचा थरार आवडतो, त्यांच्यासाठी हि जागा बेस्ट आहे. पण हा खड्डा तब्बल १००० फूट खोल आहे. त्यामुळे पोहण्याचा थरार आपल्याला महागातही पडू शकतो. त्यामुळे इथे जरा जपूनच पर्यटक आपला आनंद लुटतात.

द होल ऑफ ग्लोरी

जगात असे अद्भुत आणि आश्चर्यकारक १२ खड्डे आहेत. जे बघून तुम्हाला भोवळ येईल. त्यापैकीच एक कॅलिफोर्निया मध्ये मॉंटिसीलो धरणांनजीक असलेला द होल ऑफ ग्लोरी हा खड्डा आहे. हा खड्डा पृथ्वीच्या गर्भात २०० फूट आत जातो खरं तर या खड्ड्यांची निर्मिती जमा झालेल्या पाण्याला वाहून जाण्यासाठी केली गेली आहे. मानवनिर्मित आणि नसर्गिक अशा दोन्ही शक्तींनी तयार केलेले हे हॉल्स आजही आपल्याला चकित करतात.

द डेविल्स सिंकहोल

द डेविल्स सिंकहोल हि आश्चर्यकारक व अद्भुत अशी जागा अमिरिकेतल्या टेक्सस मध्ये आहे. हि जागा दिसायला खड्ड्यासारखी असली तरी ती एक प्रकारची नैसर्गिक अशी गुहा आहे. या गुहेत जाण्यास आपणास सक्त मणी आहे. या तब्बल ४०० फूट खोल गुहेत लाखो वटवाघूळ राहतात. म्हणून आजवर द डेविल्स सिंकहोल या गुहेत कोणीही गेले नाही.

सॉ मिल सिंक

सॉ मिल सिंक हा जगातील अद्भुत खड्ड्यांपैकी एक आगळावेगळा खड्डा म्हणून ओळखला जातो. सॉ मिल सिंक हि पुरात्तव खात्यासाठी अत्यंत महत्वाची अशी जागा आहे. बहामामध्ये असलेल्या या होलमुळे शास्रज्ञाना पृथ्वी हजारो वर्षांपूर्वी कशी होती, हे समजण्यास मदत झाली आहे. सॉ मिल सिंक याची खोली तब्बल ३३. ५ मीटर म्हणजे १०९ फुटांपेक्षा जास्त आहे.

 

 

 

 

 

 

 

 

द हारवूड होल

द हारवूड होल हि एक सरळ पृथ्वीच्या आत असलेली नैसर्गिक गुफा आहे. हि गुफा न्यूझीलंडमध्ये आहे. द हारवूड होल या गुफेची खोली तब्बल ३५७ मीटर म्हणजे ११०० पेक्षा जास्त खोल आहे. हि गुफा पृथ्वीच्या सरळ आत गेली असली तरी आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते.

LEAVE A REPLY

*