पत्नी व नात्यातील मुलाला ठार करून इसमाची आत्महत्या?

0

पिंपळगाव बसवंत | पिंपळगाव बसवंत येथे पत्नी व शिक्षणासाठी आलेल्या नातेवाईकाच्या मुलाला मारून इसमाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.

येथील पवननगर परिसरात पंधरा दिवसापुर्वीच हे कुटुंब वास्तव्यास आले होते. पत्नी सुरेखा रवींद्र नागमल व त्यांच्याकडे शिक्षणासाठी आलेला मुलगा विशाल विजय पानपाटील (वय 10) यांना ठार करून रवींद्र भटु नागमल यानेही आत्महत्या केली.

वरील प्रकार कशामुळे घडला असावा याचा तपास सुरु आहे. दरम्यान, पत्नीला आधी मारले नंतर शिक्षणासाठी आलेला नातेवाईक मुलाला मारले. त्यानंतर स्वतःही गळफास घेत आत्महत्या केली असल्याची चर्चा या परिसरात आहे.

या घटनेतील नागमल दांपत्याचा मुलगा अमोल रविद्र नागमल हा सुखरूप आहे. सकाळी दहा वाजता पाणी आले म्हणून शेजारचे बोलावयाला गेले त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

LEAVE A REPLY

*