रिमोट देण्याच्या वादातून पतीनेच केला पत्नीचा खून

1
नवीन नाशिक | सिडकोतील दत्त नगर परिसरात विवाहितेचा पतीकडूनच खून झाल्याची घटना घडली आहे. विवाहितेचे नाव शोभा पांडुरंग मनवत्कर (वय 32) असल्याचे समजते.

टीव्हीचा रिमोट न दिल्याचा राग मनात धरून तीघा मुलींसमोर पतीनेच पत्नीच्या डोक्यात दगड घातल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.

सदर घटना पहाटे चारच्या सुमारास घडली. दरम्यान, संशयित पतीविरोधात अंबड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

1 COMMENT

  1. छोटी छोटी कारणे बळी घेतात त्यामुळे क्रोधावर नियंत्रण ठेवले पाहिजे…..शरद रामदास दातीर

LEAVE A REPLY

*