एसटीतील ‘वाय-फाय’ जुळणी रेंगाळली

जेनेरिक औषधांसाठी आगारांची यादी तयार

0
नाशिक | दि. १४ प्रतिनिधी- प्रवाशांच्या सेवेत ग्राहकाभिमुख उपक्रम राबवण्याचा एसटीचा कल आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे प्रवाशांना आकर्षित करण्याचे एसटीचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवासात मनोरंजनाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी एसटीत बसवल्या जाणार्‍या वाय-फाय जुळणीला तांत्रिक अडचण उद्भवली आहे. त्यामुळे हा उपक्रम रेंगाळली आहे.

प्रवाशांना स्वस्त औषधे बसस्थानकांवरच उपलब्ध व्हावेत म्हणून एसटी महामंडळाने आगारांमध्ये जेनेरिक ही स्वस्त दरातील औषध विक्री सुरू करण्याची दुकाने सुरू करण्यासाठी नाशिक विभागाने आपल्या परिघातील आगारांची यादी मध्यवर्ती कार्यालयाकडे रवाना केली आहे. त्यामुळे लवकरच नाशिक जिल्ह्यातील एसटी आगारांमध्ये जेनेरिक मेडिकल स्टोअर कार्यान्वित झालेले दिसणार आहे, असे एसटी महामंडळाच्या नाशिक विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी सांगितले.

प्रवासादरम्यान प्रवाशांना बसगाड्यांमध्ये मनोरंजनाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी फाय-फाय सुविधा ही खासगी कंपनीने ना नफा-ना तोटा या तत्त्वावर एसटीत सुरू करण्यासाठी पावले उचलली होती. मात्र वाय-फायची सुविधा एसटीत देताना तांत्रिक अडचणी उद्भवल्या आहेत. त्यामुळे वायफायची जुळवणी एसटीने थांबवली आहे. हा उपक्रम एसटी महामंडळाचा नव्हता तर एका खासगी माहिती तंत्रज्ञान कंपनीने पुढाकार घेऊन एसटीला ही सुविधा देऊ केली होती. त्यामुळे एसटीचे यात काही नुकसान झालेले नाही, असे विभाग नियंत्रक जोशी म्हणाल्या.

परिवर्तन श्रेणीतील नव्या बसगाड्या स्टीलमध्ये बांधणी करण्यात आलेल्या आहेत. अशा ५० गाड्या नाशिक विभागाला मिळणार आहेत. मात्र या गाड्या कधी मिळतील याची माहिती वरिष्ठ पातळीवर विभागाला मिळालेली नाही. एसटीच्या लोगोमध्ये जय महाराष्ट्र हा जयघोष रेखटण्याचे काम एसटी महामंडळाच्या सर्व आगारांत सुरू होते. त्यामुळे सुमारे ११०० गाड्यांवर जय महाराष्ट्र ही घोषणा दिसत आहे.

एसटीने प्रवाशांना ३० रुपयांत चहा-नाश्ता हा उपक्रम बर्‍याच महिन्यापूर्वी सुरू केला आहे. त्यामुळे नाशिक विभागात नाशिकमध्ये येवला येथे, नंदुरबारमध्ये आणि धुळे जिल्ह्यातील मार्गावर प्रवाशांना चहा, शिरा, पोहे, इडली सांबर ३० रुपयांत उपलब्ध होते.

LEAVE A REPLY

*