शुभकार्याची सुरुवात स्वस्तिक काढून का करतात?

0

कोणताही धार्मिक मंगल विधी करताना किंवा आरंभलेले कार्य निर्विघ्न होण्यासाठी, आरंभी स्वस्तिक रेखाटले जाते. त्यामुळे विघ्न दूर होतात. इडा-पिडा टळते. स्वस्तिक हे शुभ आणि रहस्यमय मानले गेले आहे. महान ऋषिमुनी, तत्त्ववेत्ते, आचार्य, योगी, धर्माचार्य यांनी स्वस्तिकाला फार महत्त्व दिले आहे.

शुभचिन्ह स्वस्तिक. विष्णूचे पूर्ण प्रतीक. विष्णूचा अर्थ सर्वव्यापी ब्रह्म. चारी दिशांना पसरलेले ब्रह्म आणि सर्वात्मा असल्याने संपूर्ण विश्वाला स्वत:मध्ये सामावून घेणारा. म्हणूनच स्वस्तिक हे शुभचिन्ह मानले जाते. स्वस्तिकाच्या केंद्रस्थानाला विष्णूचे नाभीस्थान मानले जाते. म्हणूनच त्याला ब्रह्म नाभीकमळ असेही म्हणतात.

आपली प्रतिकात्मक सर्व शुभचिन्हे त्यात आहेत. ते मांगल्याचे प्रतीक समजले जाते. ते समृद्धीदायक, सुखकारक आहे. स्वस्तिक हे शिवशक्ती, गणेश, सूर्य, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली आदी देवतांच्या अधिष्ठानांचे प्रतीक मानले जाते.

स्वस्तिकाचेही अनेक प्रकार आहेत. त्याची माहितीही मोठी मनोरंजक आहे. स्वस्तिक म्हटले की आपल्याला साधे स्वस्तिक आठवते. परंतु त्याची रूपे खूप अर्थपूर्ण अशी आहेत.

1) पारंपरिक स्वस्तिक म्हणजे चौरसात एक बाजू कमी असे चार चौरस एकमेकांना जोडलेले असतात.
2) चंद्रस्वस्तिक :
दुसरा प्रकार स्वस्तिकाच्या चारी टोकावर बीजेच्या चंद्राप्रमाणे चारी बाजूला कोर असते.
3) वलांक स्वस्तिक :-
तिसरा प्रकार स्वस्तिकाच्या चारी कोपर्‍यांवर चारी बाजू वलांक घेणार्‍या ओळीप्रमाणे असतात.
4) भरीव स्वस्तिक :-
अशा पद्धतीने पण स्वस्तिकाचे शुद्ध व परमपवित्र रूप हे चौथ्या प्रकारचे स्वस्तिक आहे.
5) टिंबांचे स्वस्तिक :-
या स्वस्तिकात टिंबे असतात.
काही ठिकाणी तिरप्या रेषांनी सुद्धा स्वस्तिक काढतात. पण स्वस्तिकाचे शुद्ध व परमपवित्र रूप हे तिस-या प्रकारचे स्वस्तिक आहे. स्वस्तिकाच्या केंद्राला विष्णूचे नाभीस्थान मानले जाते. जेथून ब्रह्मा उत्पन्न होतात. त्यालाच ब्रह्म नाभीकमळ असेही म्हणतात.

स्वस्तिक हे विष्णूचे पूर्ण रूप मानले जाते. तसेच त्याच्या चार भुजा म्हणजे स्वस्तिकाच्या चार बाजू समजल्या जातात. म्हणजे त्यांच्या ठिकाणी शंख, चक्र, गदा, पद्म हे धारण केलेल्या श्री विष्णूच्या चारी भुजा आहेत.

त्यामुळे स्वस्तिक विष्णूचे पूर्णरूप आहे. विष्णूचा अर्थ म्हणजे सर्वव्यापी ब्रह्म असा आहे. चारी दिशांनी पसरलेले ब्रह्म आणि सर्वात्मा असल्यामुळे संपूर्ण विश्वाला स्वत:मध्ये सामावून घेते असे हे सुख-समृद्धीचे चिन्ह आहे.

हिंदू शास्त्राप्रमाणे स्वस्तिक हे गणपतीचे प्रतीकही मानतात. प्रत्येक बाजूला गणपतीची स्थापना असे समजतात. प्रत्येक बाजू गणपतीची सोंड आहे आणि स्वस्तिकाच्या चारी बाजूंना बिंदू काढले जातात. कोणत्याही बाजूने गणेशाच्या दोन्ही बाजूने दोन बिंदू म्हणजे गणपतीच्या पत्नी म्हणजे रिद्धी व सिद्धी असे मानले जाते. म्हणून कार्यारंभी स्वस्तिक रक्षणाचे प्रतीक म्हणून काढले जाते.

कारण स्व-अस्ति म्हणजे मी स्वत: आहेे असा त्याचा अर्थ लावला जातो. हिंदू धर्मात दारात, घरात, देवापुढे, तुळशी वृंदावनापुढे स्वस्तिक, चंद्र, सूर्य, गोपद्म (गायीची पावले) लक्ष्मीची पावले, शंख, चक्र, गदा, तुळशी वृंदावन, ज्ञानकमळ काढतात. ही सगळी प्रतिके आहेत. ज्या स्थानी ही चिन्हे रेखिली व पूजिली जातात तिथे या चिन्हांच्या रूपाने स्वत: विष्णू भगवान, चंद्र, सूर्य, गाय, लक्ष्मी, शंख, चक्र, गदा पद्मासह भगवंत हजर असतात. त्यामुळे आपले संरक्षण करणारे प्रत्यक्ष विष्णूभगवान आहेत या भावनेने आपण निर्भय असतो. आपल्याला एक मानसिक आधार असतो. असा आहे स्वस्तिकचा महिमा.

LEAVE A REPLY

*