शेतकर्‍यांच्या पशुधनाला वाली कोण ?

पशुवैद्यकिय अधिकार्‍याची नेमणूक करण्याची मागणी

0
उमराळे बु.| संजय थेटे- दिंडोरी तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागात रोख पैसे देणारा व शेतीला जोडधंदा म्हणून प्रामुख्यांने दुग्ध व्यवसाय केला जातो. गावागावात खाजगी दूध संकलन केंद्र उभारुन युवकांना रोजगारासाठी दुग्ध व्यवसायाकडे वळवले आहे. मात्र लाख मोलाच्या पशुधनांच्या आरोग्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून उमराळे बु.॥ येथे बांधलेल्या जिल्हा परिषद नाशिक पशूवैदयकीय दवाखान्यांमध्ये वैदयकिय अधिकारीच नसल्यामुळे पशुधनाला वाली कोणी नसल्याचे चित्र दिसत आहे.

संपूर्ण कारभार परिचर हिरे पहात असल्याने वैद्यकीय दवाखाना शोभेची वास्तू बनली आहे. उमराळे बु. हे ४० ते ५० गांवाचे केंद्रबिंदू असल्याने उमराळे बु. येथे पशूवैद्यकीय दवाखाना बांधण्यात आला. मात्र येथे श्रेणी एक पशूवैद्यकीय केंद्र असून परिचरला शिपायाचे सुध्दा काम पहावे लागत आहे. परिसरातील जवळपास १० ते १५ हजार पशूधनाच्या आरोग्य साठी महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍यां या दवाखान्यात जगदाळे यांच्या सेवानिवृत्ती नंतर वैद्यकीय अधिकारी मिळालेला नाही.

तब्बल तीन वर्षापासुन वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे. त्यामुळे पशू पालकांना खाजगी डॉक्टारांकडून उपचार करुन घ्यावे लागत असल्याने पशूवैदयकीय केंद्र शोभेची वास्तू बनले आहे. येथे त्वरीत पशुवैधकीय अधिकारी नेमावा यासाठी उमराळे बुद्रुक ग्रामपंचायतीने नोब्हेबर महिन्यात ग्रामसभेत तसा ठराव करुन जिल्हा परिषद अध्यक्षा, समाजकल्याण सभापती, पंचायत समिती सभापती, उपसभापती, गट विकास अधिकारी तालुका पशूवैद्यकीय अधिकारी तालूका आरोग्य अधिकारी यांना पत्र दिले. परंतु अद्यापही वैदयकीय अधिकार्‍यांची नियुक्ती झाली नाही.

पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने शेतकर्‍यांना खाजगी डॉक्टरांकडून उपचार करून समाधान मानावे लागते. पशूसर्ंवधन विभागाच्या रिक्त पदामुळे उमराळे बु . परिरातील पशुपालकांचे पशुधन रामभरोसे झाले आहे.उमराळे बु. परिसर हा आदिवासी भाग असल्याने सर्पदंश, विषबाधा , लाळ, फर्‍या खूकद यासारखे साथीच्या आजाराची लागण पशुधनाला नेहमी होत असते.

पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने शेतकर्‍यांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. प्रशासकीय यंत्रणा कूचकामी ठरत असल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे .. उमराळे येथे त्वरित पशुवैदयकीय अधिकार्‍याची नियुक्ती करावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी नेमावा
उमराळे बु.॥ येथे आदीवासी जिल्हा परिषद नाशिक पशुवैद्यकीय दवाखान्याला तीन वर्षापासून पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामूळे गाई ,वासरे यांचे आरोग्य धोक्यांत आले असून येथे त्वरित पशुवैद्यकीय अधिकार्‍याची नियुक्ती करावी.
-अशोक धात्रक -उपसपरंच उमराळे बु

LEAVE A REPLY

*