Type to search

नाशिक

कंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा

Share

नाशिक । प्रतिनिधी

कंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कामावर कायम ठेवावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य कत्राटी कर्मचारी महासंघाच्यावतीने कामगार मंत्री डॉ.संजय कुटे यांना देण्यात आले.

मंत्रालयीन सचिव महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे शाहरख मुलाणी यांनी हे निवेदन दिले. मंत्रालय ते ग्रामपंचायत पर्यंत विविध शासकीय तसेच निम शासकीय कार्यालयात कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यरत आहे. कंत्राटी कर्मचारी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना यशस्वी करत आहेत.

परंतु, अनेक ठिकाणी राजकीय हेवेदावे यामुळे कर्मचारी बळी पडत आहेत. परिणामी कर्मचार्‍यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. अनेक दिवस काम करून संबंधित कर्मचार्‍याला कामाचा अनुभव आलेला असतो. आपल्या प्रगतीशील आणि पारदर्शी सरकार मध्ये कंत्राटदार बदलला तरी कर्मचारी तेच ठेवल्यास काम करताना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.

कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याबाबतचा शासनाच्या वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींची बचत होईल. त्यानुषंगाने त्याच पदासाठी कंत्राट मागवले असता तेच कर्मचारी ठेवावेत. असे शाहरुख मुलाणी मंत्रालयीन सचिव महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघ यांनी सांगितले. यावेळी कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी कंत्राटी कामगारांना न्याय देऊ, असे आश्वासन दिले.

यावेळी महासंघाचे अध्यक्ष मुकूंद जाधवर, कोषाध्यक्ष विकास डेकाटे, कार्याध्यक्ष सचिन जाधव, राज्य सचिव बाबासाहेब कोकाटे, सरचिटणीस शहाजी नलवडे आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!