जेव्हा दुचाकीच्या शीटाखाली साप निघतो…

0
मनमाड(प्रतिनिधी) | घटना आहे मनमाड येथील एका शाळेतील. शाळेच्या आवारात काही विद्यार्थ्यांची वाहने उभी आणि सायकली उभ्या होत्या. शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले होते.

अचानक एका विद्यार्थिनीच्या दुचाकीच्या शीटाखाली शेपूट दिसून आली. शीटाखाली साप असल्याचे निदर्शनास येताच  विद्यार्थ्यांची आरडाओरड सुरु झाली.

 

 

मनमाडमधील  छत्रे हायस्कुलच्या आवारात ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी सर्पमित्राला पाचारण केले. सर्पमित्राने सापाला पकडून जंगलात सोडले त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

छत्रे हायस्कूलची दहावीत शिकणारी रेणू सूर्यवंशी दुचाकीने शाळेत ये-जा करते. शाळा सुटल्यानंतर रेणू स्कुटीजवळ आली असता तिला सापाची शेपूट दिसून आली होती.

LEAVE A REPLY

*