राष्ट्रपती जेव्हा नाशिकच्या पावसाची आठवण काढतात….

0

नाशिक, ता. १२ : नाशिक जून, जुलै महिन्यात नाशिकच्या पश्चिम पट्यात झालेल्या जोरदार पावसाची दखल थेट महामहिम राष्ट्रपतींनीही घेतली आहे.

त्यामुळेच की काय जेव्हा नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी नाशिकला चांगला पाऊस झाल्याचे सांगितले. यामुळे खासदार गोडसेही चकीत झाले.

गोडसेंना कोण नाही ओळखत, आपले नाव विसण्यासारखे नाही, अशी मिश्किल टिपणीही त्यांनी खा. गोडसेंनी ओळख करून दिल्यावर केली.

यावेळी विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. सध्या खासदारांचे स्वीय सहायक खासगी पद्धतीने नियुक्त होतात, त्याऐवजी ते लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील, तर संसद व अन्य कामकाजात अशा प्रशिक्षित सहायकांचा नक्कीच उपयोग होईल.

तेव्हा या बाबत विचार करावा, असे खा. गोडसे यांनी राष्ट्रपतींना सांगितले, त्यावर यावर चांगली सूचना आहे निश्चित चर्चा करून यावर विचार करू असे आश्वासन राष्ट्रपती महोदयांनी दिले.‍

याशिवाय शेती, ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण, नगरविकास इत्यादी सर्व विषयांची माहिती मिळण्यासाठी व त्यातून पारदर्शक कारभार होण्यासाठी इस्त्रोची व्याप्ती वाढवावी असेही सूचना खा. गोडसे यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

*