Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

Video : सिग्नलवरचा पुस्तकविक्रेता चेतन भगत यांनाच म्हणाला ‘अच्छा लिखता है बंदा’

Share

वृत्तसंस्था | प्रसिद्ध लेखक चेतन भगत आपल्या कारमधून प्रवास करत असताना एका  सिग्नलवरच्या पुस्तक विक्रेत्याला त्यांनी चेतन भगत कसा लिहितो? असे विचारले तेव्हा हा पुस्तक विक्रेता उत्तरला की, अच्छा लिखता है बंदा..असे म्हटले. दरम्यान,  आपणच चेतन भगत असल्याचे भगत यांनी सांगितल्यानंतर विक्रेत्याने त्यांच्यासोबत हस्तांदोलन केले.

याबाबतचा एक व्हिडीओ चेतन भगत यांनी ट्वीटरवर नुकताच शेअर केला असून यामध्ये सिग्नलवर पुस्तकांची सर्रास पायरसी करून विक्री होते. आपला या गोष्टीला पाठींबा नसला तरी हा काहींचा रोजगार असल्याचे भगत म्हणाले.

२ लाख ट्वीटर युजर्सने हा व्हिडीओ आतापर्यंत बघितला असून हजारो लाईक्स आणि कमेंट्स या व्हिडीओला मिळाले आहेत.भगत यांच्यासोबत असलेल्या एका सहकाऱ्याने हा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!