व्हिल एक्सेलचा प्रस्ताव रेल्वेच्या विचाराधीन

खा. हेमंत गोडसे यांची माहिती

0
दे. कॅम्प | दि. १० वार्ताहर- एकलहरे येथील रेल्वे ट्रॅक्शन कारखान्याचे विस्तारीकरण करून येथील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. तसेच या भागाचा औद्योगीकदृष्ट्या विकास व्हावा, या उद्देशाने खा. गोडसे यांनी सुरेश प्रभू यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे बोर्ड सदस्य नवीन टंडन यांनीही या विस्तारीकरणाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पुढील मार्ग मोकळा झाला आहे.

सन १९८३ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री मधु दंडवते यांनी २५० एकर जागा अधिग्रहित करून रेल्वे ट्रॅक्शन कारखाना सुरू केला. या कारखान्यात सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. जवळपास ५०० कामगार या ठिकाणी कार्यरत असून रेल्वे विद्युत इंजिनला लागणार्‍या मोटर्स, आर्मीचर रिपेरिंगचे काम येथे होते.

मोठ्या संख्येने येथील कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने कामगार भरती करणे अनिवार्य आहे. विस्तारीकरणासाठी लागणारी जमिन या ठिकाणी उपलब्ध असून नव्याने तिची खरेदी करणे गरजेचे नाही. मध्यवर्ती ठिकाण असल्याने दळणवळणाच्या सोयी या ठिकाणी उपलब्ध आहेत. नवीन ठिकाणी सदर प्रकल्प उभारणी करावयाचा असल्यास रेल्वेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ पोहोचणार आहे.

कारखाना विस्तारीकरणामुळे हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. याबाबत खा. गोडसे यांनी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केला असून रेल्वे बोर्ड सदस्य (विद्युत) नवीन टंडन यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिल्यानंतर त्यांनीही सर्व बाबींचा अभ्यास करून रेल्वेसाठी सोयीचा ठरेल असा प्रस्ताव करणार असल्याचे मान्य केले. प्रशासनानेदेखील याबाबत पाठपुरावा सुरू केला असून ‘मेक इन नाशिक’ कार्यक्रमप्रसंगी या विषयावर जनरल मॅनेजर शर्मा यांनी अभिप्राय दिला आहे.

एकलहरे परिसरातील औष्णिक विद्युत केंद्राचा ६६० मेगावॅट निर्मितीचा प्रकल्प उभारणीअभावी रखडला असून तो इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर रेल्वे ट्रॅक्शन कारखाना विस्तारीकरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

LEAVE A REPLY

*