#whatsappdown : व्हॉटस्अप सुरू; मै ब्लॉक तो सब ब्लॉक… वाचा बंदचे हे अनोखे कारण

जगभरातील व्हॉटस्‌अप होते तासभर बंद; वापरकर्ते झाले हैराण

0

नाशिक, ता. ३ : आज दुपारी दीडच्या सुमारास अचानक व्हॉटस्‌अपवरून संदेश येणे बंद झाले, तेव्हा अनेकांना  वाटले की ही समस्या आपल्या इंटरनेटची आहे.

अनेकांनी आपल्या मोबाईलच्या नेटवर्क  सेटिंगमध्ये बऱ्याच खटपटीही केल्या. पण शेवटी समजले की हा केवळ नाशिक, पुणे, नगर, जळगावचा प्रश्न नसून भारतासह अनेक देशांमध्ये हीच स्थिती होती.

अखेर दीड तासानंतर अडीचच्या सुमारास ते भारतात सुरू झाले.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार भारत, रशिया, इंडोनेशियासह युरोपातही व्हॉटसअप बंद होते.

वापरकर्त्यांनी #whatsappdown असा ट्रेंड ट्विटरवर सुरू केला असून त्यावर विविध देशातून प्रतिक्रिया येत आहेत.

प्रसिद्ध लेखक चेतन भगतने ट्विट केलेय की नक्कीच भारतीय इंजिनियअर असेल आणि त्याच्या मैत्रिणीने ब्लॉक केल्यामुळे वैतागून त्याने ‘ले फिर, मै ब्लॉक तो सब ब्लॉक’ म्हणून सर्वांना ब्लॉक केले असणार. अर्थात या विनोदी प्रतिकियेलाही अनेकांनी रिट्विट केलेय.

त्यावर कपिल शर्मा नावाच्या एकाने लिहिलेय की इंजिनियअरला तसे केले का माहिती नाही, पण माझ्या मैत्रिणीने मला ब्लॉक केले. त्यामुळे शांतता तरी मिळाली.

LEAVE A REPLY

*