Type to search

Breaking News टेक्नोदूत मुख्य बातम्या

#WorldEmojiDay : आभासी संवादासोबतच प्रत्यक्ष संभाषण ही गरजेचे

Share

मुंबई : आपल्या आयुष्यात भावनांना खूप महत्व आहे. व्यक्तीला आलेला राग, दुःख, राग हे व्यक्त करत असतो. यातून विविध भावमुद्रा आपल्याला यातुन दिसुन येतात. तसेच सोशल मीडिया आल्यापासून व्यक्ती बोलून नाहीतर इमोजीच्या आधारे आपल्या भावना व्यक्त करीत असते.

समोरासमोर संवाद साधताना आपण सहजच बोलून जातो. मात्र ऑनलाइनच्या युगात संवादाचे माध्यम बदलल्याने तुम्हाला चॅटिंग करावी लागते. तीच चॅटिंग सध्या इमोजीच्या माध्यमातून केली जाते. म्हणजेच संवादाचे माध्यम चॅटिंग तर भावना व्यक्त करण्याचं इमोजी. जाणून घेऊया जागतिक इमोजी दिनाच्या निमित्ताने.

२०१४ सालापासून जागतिक इमोजी दिन साजरा करण्यात येतो. आज या इमोजी दिवसांच्या निमित्ताने भारतात मुख्यत्वे दोन इमोजींचा अधिक वापर केला जातो. यामध्ये ‘आनंदाश्रू’ आणि ‘ब्लोइंग अ किस’ या दोन इमोजींचा समावेश होतो.

त्यानंतर स्माइलिंग फेस विथ हार्ट आइज, किस मार्क, ओके हँड, लाउडली क्राईंग फेस, बिमिंग फेस विथ स्माईलिंग आइज, थम्स अप, फोल्डेड हँड्स आणि स्माईलिंग विथ सनग्लासेस या इमोजीचा वापर होत असल्याचे ही या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान संवाद हे एकमेकाना समजून घेण्याचं प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. त्यामुळे इमोजीचा वापर करतांना सोबत संवादही घडून आला पाहिजे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!