Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

अफवा, खोट्या बातम्या, माहिती टाळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपची ‘टिपलाइन’ सुविधा

Share
नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर बऱ्याच अफवा पसरविल्या जातात. तसंच, खोटी माहिती दिली जाते. त्यामुळं या अफवांना आळा घालण्यासाठी आणि खोट्या बातम्यांचा प्रसार टाळण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅपनं ‘टिपलाइन’ ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेर्तंगत नागरिकांना मिळालेल्या माहितीची सत्यता आणि विश्वासार्हता तपासता येणार आहे. प्रोटो या भारतीय स्टार्टअप कंपनीनं ही ‘टिपलाइन’ तयार केली असून मंगळवारपासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

भारतातील नागरिक त्यांना मिळालेली चुकीची माहिती, अफवा ‘चेकपॉइंट टिपलाइन’ला व्हॉट्‌सअॅपवर ९६४३०००८८८ या क्रमांकावर पाठवू शकतात, असे व्हॉट्‌सअॅपने सांगितले आहे. व्हॉट्सअॅप यूजरने संशयित संदेशाची ही माहिती टिपलाइनसोबत शेअर केल्यावर ‘पीआरओटीओ’चे पडताळणी केंद्र त्यावर प्रतिक्रिया मागवेल, तसेच संबंधित माहितीबद्दलचा दावा पडळण्यात आला किंवा नाही याची माहिती संबंधित यूजरला कळवली जाईल.

संबंधित माहिती ही खरी आहे, खोटी आहे, दिशाभूल करणारी आहे, वादग्रस्त आहे किंवा संदर्भहीन आहे, अशा स्वरूपात ही प्रतिक्रिया कळवली जाईल. याशिवाय उपलब्ध असणारी इतर माहितीही दिली जाईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. छायाचित्रे, व्हिडिओ लिंक किंवा मजकूर या स्वरूपातील माहितीचा आढावा या केंद्रात घेतला जाईल. त्यामध्ये इंग्रजीसह हिंदी, तेलगू, बंगाली आणि मल्याळम या भाषांतील माहिती पडताळणी जाणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!