अफवा रोखण्यासाठी व्हॉट्सअॅप आणणार नवं फीचर

0
नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नोटीस पाठवल्यानंतर आता व्हॉट्सअॅपने अफवा रोखण्यासाठी नवे फीचर आणण्याचे आश्वासन दिले आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांमुळे देशभरात अनेक ठिकाणी हिंसा झाली आहे. व्हॉट्सअॅपला आम्ही एक नोटीस पाठवली आहे. व्हॉट्सअॅपवरुन पसरणाऱ्या अफवांमुळे मागील काही दिवसांत जमावाकडून होणाऱ्या हत्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. मुले पळवण्याच्या अफवेवरुन सर्वाधिक लोकांचे बळी गेले. यामुळे व्हॉट्सअॅपला आता सावध आणि जबाबदार व्हावे लागेल,” असे वक्तव्य रविशंकर प्रसाद यांनी केले आहे.

 

मूल चोरणारी टोळी या अफवेवरून धुळ्यात पाच जणांची हत्या केली गेली. या प्रसंगाची पुनरावृत्ती मालेगावमध्ये होता होता राहिली. अशा अफवा रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. माहिती व प्रसारण मंत्रालयाने मंगळवारी व्हॉट्सअॅपला इशारा दिला होता, की हिंसेचे कारण बनणाऱ्या संदेशांना रोखण्यासाठी तात्काळ उपाय करा. सरकारने कंपनीला म्हटले होते, की तुम्ही जबाबदारीपासून दूर नाही जाऊ शकत. दरम्यान सुप्रीम कोर्टानेही म्हटले होते, की हिंसक घटना गुन्हा आहे. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. कोर्टाने हे सुद्धा म्हटले होते, की अशा प्रकारच्या घटनांना रोखण्याची जबाबदारी राज्या सरकारांची आहे.

अफवांमुळे ३० निरपराधांचे बळी

गेल्या काही दिवसापासून मुले पळविणारी टोळी सक्रिय असल्याचे मेसेज व्हायरल होत आहे. हे मेसेज व्हॉट्स ऍप, फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वाधिक प्रसारित होत आहे. यामुळे नागरिकांकडून संशयातीना मारहाण केल्याच्या घेताना घडू लागल्या आहेत. मागील काही दिवसांमध्ये व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मुले पळवणारी टोळी आल्याची फेक न्यूज व्हायरल झाली आहे. त्यानंतर यामुळे आतापर्यंत ३० लोकांचा जीव गेला आहे. या इस अफवामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. भारतात जवळपास २० कोटी लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात.

LEAVE A REPLY

*