अर्ध्या तासासाठी व्हॉट्सअॅप झालं क्रॅश!

0

गुरूवारी संध्याकाळी आर्धा तास व्हॉट्सअॅप क्रॅश झाले होते.

संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारात युजर्सला व्हॉट्सअॅपवर मेसेज येणे बंद झाले. हे सर्व झाले ते युके, युरोप व साऊथ अमेरिकेत. भारतात मात्र व्हॉट्सअॅप सुरळीत सुरु होते.

सुरूवातीला नेमके काय झाले हे लोकांच्या लक्षात आले नाही पण बराच वेळ मेसेजच येत नसल्याने व्हॉट्सअॅप क्रॅश झाल्याचे युजर्सच्या लक्षात आले. साडेसहा वाजता बंद झालेले व्हॉट्सअॅप सात वाजून अठरा मिनिटांनंतर सुरू झाले.

व्हॉट्सअॅप बंद झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध मिम्सचा अक्षरशः पाऊस पडला. व्हॉट्सअॅप जगभरातील एक अब्जपेक्षा जास्त लोक वापरतात.

व्हॉट्सअॅप क्रॅश झालं आहे का ? हे तपासण्यासाठी अनेकांनी ट्विटरचा सहारा घेतला. ट्विटरवर जाऊन व्हॉट्सअॅप बंद झाल्याची खात्री युजर्सला झाली.

व्हॉट्सअॅप युजर्सला व्हॉट्सअॅप वापरता आले नसल्याची आम्हाला खंत आहे. लोकांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत असून लवकरच समस्या सोडविण्याचे प्रयत्न आम्ही करतो आहोत, असे व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यांनी म्हंटले.

LEAVE A REPLY

*