Type to search

Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

…म्हणून मनसेबाबत निर्णय नाही : पवारांचा गौप्यस्फोट

Share

नाशिक | प्रतिनिधी

राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान, माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत चांगली वातावरण निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याबाबत पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी सांगितले की, जोपर्यत इव्हीएम हटवले जात नाही तोपर्यंत कोणत्याही विरोधी पक्षाने निडणूक लढवू नये. निवडणुकीवर बहिष्कार टाकावा अशी भूमिका मनसेची होती.

सर्वांनी मनसेच्या आवाहनाला साथ देत निवडणुकांवर बहिष्कार टाकावा असे सांगितले जात होते. मात्र, असे केले तर देश हुकुमशाहीकडे वाटचाल करेल. देशात विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही, यामुळे मनसेला सोबत घेण्याबाबत विचार सुरु असल्याचे पवार यांनी सांगितले.

पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली असून मनसेची या निवडनुकीतील भूमिका काय होती याबाबतचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

दरम्यान, मनसे पक्षाकडून याबाबत कुठलीही प्रतिक्रिया मिळाली नाही. तसेच आगामी निवडणुकीत मनसेची काय भूमिका असेल याबाबत देखील कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!