Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये आज आढळून आलेल्या रुग्णांची काय आहे हिस्ट्री? आज सील केलेल्या परिसराची...

नाशिकमध्ये आज आढळून आलेल्या रुग्णांची काय आहे हिस्ट्री? आज सील केलेल्या परिसराची माहिती जाणून घ्या

नाशिक | प्रतिनिधी 

आज सकाळी नाशिकमधील काही अहवाल करोना बाधित आले आहेत. यामध्ये एकूण १५ रुग्णांचा समावेश आहे. यात १३ रुग्ण मनपा हद्दीतील तर इतर दोघे मनपाबाहेरील आहेत.

- Advertisement -

पाथर्डी फाटा येथील कोरोना बाधित रुग्णाची आई कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला आहे. हिरावाडी येथील राहणारे परंतु मालेगाव येथील कार्यरत पोलीस कर्मचारी यांच्या पत्नीचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आला आहे.

सातपूर येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील मुलगा, नात, किराणा दुकानदार व दोन भाडेकरू हे कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो परिसर याआधीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.

तसेच या महिलेच्या संपर्कातील त्यांचे भाऊ श्रीकृष्णनगर, सातपूर येथील रहिवासी असून ते कोरोना बाधित असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांचा कृष्ण नगर सातपूर हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

सदर महिलेचे जाधव संकुल अशोक नगर सातपूर येथील तीन भाचे करोना बाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामुळे हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

हनुमान चौक सिडको नाशिक येथील रहिवासी टायफाईड झाला म्हणून सिडको येथील प्रथम हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते. मात्र त्यांना फुफ्फुसाचा त्रास होत असल्याने त्यांना झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून ते ज्या परिसरात राहतात तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

पाटील नगर सिडको येथील रहिवाशी महिला सर्दी खोकल्याचा त्रासामुळे अशोका मेडिकव्हर येथील रुग्णालयात भरती झाल्या होत्या. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने त्यांचे रहिवासी परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे.

सायंकाळी ७ च्या सुमारास प्राप्त झालेल्या अहवालानुसार, ४ अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथील कार्यरत आय टी यू मधील कार्यरत डॉक्टर राहणार धात्रक फाटा पंचवटी कोरोना बाधित आहेत.

इंदिरा नगर येथील ६५ वर्षीय व्यक्ती व तारवाला नगर दिंडोरी रोड येथील ६६ वर्षीय व्यक्ती यांना ताप येत असल्याने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलेले होते त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.

सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झालेले ५१ वर्षीय व्यक्ती राहणार कोणार्कनगर यांचा अहवाल कोरोना बाधीत असल्याचा आला असून यासर्वांचे रहिवाशी परिसर प्रतिबंधित क्षेत्र करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

हे आहेत नाशिकमधील प्रतिबंधित क्षेत्र 

- Advertisment -

ताज्या बातम्या