Thursday, April 25, 2024
Homeनाशिकआज नाशिकमध्ये आढळून आलेला करोनाबाधित रुग्ण कुठला? जाणून घ्या हिस्ट्री

आज नाशिकमध्ये आढळून आलेला करोनाबाधित रुग्ण कुठला? जाणून घ्या हिस्ट्री

नाशिक | प्रतिनिधी 

आज सकाळी पावणेअकरा वाजेच्या नाशिक महापालिकेच्या हद्दीत एक रुग्ण करोनाबाधित आढळून आला आहे. हा रुग्ण मुंबईत नोकरीला असून नाशिककरांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

आज शहरातील गंगापूरोड भागात थत्तेनगर येथे मुंबईहुन आलेली व्यक्ती करोना बाधीत आढळुन आला आहे. ही व्यक्ती राहत असलेला बंगला आता सिल करण्यात आला आहे. यामुळे शहरातील रुग्णांची संख्ंया 49 झाली असुन यापैकी 37 जण बरे होऊन घरी गेले आहे.

ही व्यक्ती मुंबईला नोकरीनिमित्त राहत असुन ते नुकताच नाशिकला आल्यानंतर त्यांना त्रास झाल्याने ते एका खाजगी रुग्णालयात दाखल झाली होते. आज सकाळी तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला. यामुळे त्यांची पत्नी व मुलगी यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही व्यक्ती मुंबई येथून आलेली असल्याने आता मुंबईला ज्या ठिकाणी राहत होती, त्या भागात त्यांचा कोणाशी संपर्क आला, त्याठिकाणी अति जोखमीच्या व कमी जोखमीच्या व्यक्तींंना अलगीकरण कक्षांत ठेवण्यासंदर्भात संबंधीतांना माहिती दिली जाणार असल्याची माहिती महापालिका वैद्यकिय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली.

आज वाढलेल्या रुग्णामुळे नाशिक महापालिकेच्या हद्दीतील रुग्णसंख्या आता ४९ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत नाशिक शहरातून ३७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या