Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच टेक्नोदूत मुख्य बातम्या

सोशल मीडियाचे सर्व्हर डाऊन होणे म्हणजे नेमके काय रं भाऊ?

Share

देशदूत डिजिटल विशेष

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाँट्सअँप, स्नॅपचॅट आणि ट्विटरसारख्या सोशल मिडीयाने अचानक सर्व्हिस बंद केली तर…काय होईल याची कल्पना कधी केलीये का? जर बंद झालं सगळं आणि पुन्हा १९९० चा कालखंड आठवला तर काय होईल?

आताची तरुणाई असे झाल्यावर काय करेल?  सर्वजन चिंताग्रस्त, घाबरलेले किंवा शांत राहणार का? यावर्षीच भारतात अनेकदा सोशल मिडीयाने नांगी टाकलेली बघायला मिळाली आहे. सोशल मीडिया अँप्स अनेक तास बंद होते किंवा व्यवस्थित काम करत नव्हते. याला तंत्रज्ञानाच्या भाषेत अँप ‘डाऊन होणे’ किंवा सर्व्हर डाऊन होणे म्हटले जाते.

संदेशच्या पोस्ट, इमेजेस आणि व्हिडीओ यामुळे सर्व्हरवर अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे काही वेळा सर्व्हर डाऊन होऊ शकते. युजरने कंटाळून अँप अनइंस्टाल करू नये यासाठी एक मोठी टीम ठिकठिकाणी कार्यरत असते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रगती साधली असली तरी शेवटी ती एक तांत्रिक प्रक्रिया आहे, कधीतरी तांत्रिक बिघाड यात होऊ शकतो असे अनेक एक्स्पर्ट सांगतात.

एखाद्या सोशल मिडियाचे अँप बंद झाले तर अशा परिस्थितीत अनेकजण  ट्विटर अँपचा उपयोग करून तिथे नाराजी व्यक्त करतात.  कारण हे एकच सोशल मीडिया माध्यम उपलब्ध होते जे डाऊन नव्हते.

२१ वर्षीय कॉलेज विद्यार्थीनी दिपांशु जैन यावेळी म्हणाली, अँप डाऊन होणे हे आपल्याला जाणीव करून देते की, आपण किती अँपच्या आहारी गेलो आहोत. बहुतेक लोकांकडे असेही अँप्स आहेत जे त्यांना पाणी पिण्याची वेळ सांगतात. गोळी घेण्याची वेळ सांगतात वगैरे वगैरे.

२३८ करोड पेक्षा अधिक सोशल मीडिया युजर्स आज जगभरात आहेत.  ज्यात इस्टाग्राम आणि व्हाँट्सअँपचे युजर्स अधिक आहेत. मागील चार महिन्यात फेसबुकच्या सर्व अँप्सपैकी इंस्टाग्राम अँप सर्वात जास्त वेळा डाऊन झाले आहे.

गेल्या १४ मार्चला फेसबुकला १२ तासांचा डाऊनचा सामना करावा लागला. लोकांनी सायबर हल्ल्याची शक्यता वर्तविली असली तरी सोशल नेटवर्किंग कंपनीने हा सायबर हल्ला नसून पुन्हा एकदा सर्वरला दोषी ठरवत खापर फोडले.

फेसबुकनंतर गेल्या चार महिन्यांत, जीमेल आणि कॅलेंडर सारख्या गुगल सेवादेखील तीन वेळा डाऊन झाली. याचा फटका युजर्सला बसला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!