Type to search

Breaking News Featured maharashtra जळगाव मुख्य बातम्या

Video : मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत ‘जळगाव’साठी काय? जाणून घ्या सविस्तर

Share

नाशिक | प्रतिनिधी 

विभागीय बैठकीत जळगाव जिल्ह्याच्या आढाव्याच्या वेळी माजी मंत्री व भाजप नेते गिरिश महाजन अनुपस्थित होते. त्यांच्या मतदारसंघात समस्या नसतील म्हणून ते अनुपस्थित राहिले असा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटिल यांनी लगावला आहे.

पाटील यावेळी म्हणाले की, 100 प्रश्न मांडले 50 तात्काळ सुटले उर्वरित लवकरच मार्गी निघणार आहेत. पद्मालय धरणासाठी आवश्यक निधी तात्काळ दिला आहे.

चोपडा तालुक्यात 132 के व्ही चे वीज उपकेंद्र मंजूर झाले आहे.  जळगाव शहरात एक महिलांचे रुग्णालय होणार होते त्या साठीच्या जागेचा प्रश्न सुटला आहे.  स्थानिक प्रश्न सभागृहात मांडण्याऐवजी येथे मांडले तर तात्काळ सुटण्यास मदत होते असेही पाटील यावेळी म्हणाले.

गिरीश महाजन ‘जाम’नेरचे 

‘जाम’ वर रेटून बोलत गुलाबरावांना नेमके काय अधोरेखित करायचे होते याबाबत अचानक हशा पिकला. महाजन जाम नेरचे असे म्हणताच परिसरात काही काळ हशा पसरला होता.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!