#Google : अ‍ॅप परमिशन्स म्हणजे काय?

0

‘गुगल प्ले’वरून अ‍ॅप इन्स्टॉल करताना आपल्याला अ‍ॅप परमिशनची एक विंडो दिसते. यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. उदाहरणार्थ, आपण एखादे अ‍ॅप इन्स्टॉल करत असताना आपल्या मोबाईलमधील कोणकोणती माहिती वापरण्याचे अधिकार या अ‍ॅप कंपनीला देतो,याची ती यादी असते. काही अ‍ॅप्समध्ये त्या अ‍ॅपला आवश्यक नसलेल्या गोष्टींचीही परवानगी मागितली जाते. आपण ते सर्व न वाचता अ‍ॅक्सेप्ट करून मोकळे होतो आणि नको त्या परमिशन्सही अ‍ॅपला देऊन रिकामे होतो.

उदाहरणार्थ, एखाद्या गेमच्या अ‍ॅपमध्ये आपल्या कॉन्टॅक्ट्सची माहिती घेतात पण प्रत्यक्षात गेम खेळण्याचा अलार्म अ‍ॅपला तुमचे संदेश वाचण्याची गरज नसते. पण अनेक अलार्म अ‍ॅप्समध्ये संदेशसाठीची परवानगी घेतली जाते. यामुळे अश अनावश्यक माहिती अनोळखी कंपन्यांना जाऊ नये, यासाठी अ‍ॅप परमिशन्स वाचणे गरजेचे असते. आपण जे अ‍ॅप घेत आहोत त्या अ‍ॅपला खरोखरीज या सर्व गोष्टींची गरज आहे का, हे महत्वाचे आहे.

शिवाय गुगल प्लेवरील सर्वच अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्या अ‍ॅप चेरेटिंग तसेच त्याच्यावर वापरकर्त्यांच्या आलेल्या कमेंट्स आपण सहसा वाचत नाही. पण जर त्या वाचल्या तर आपल्याला नक्कीच अ‍ॅपविषयी काही माहिती मिळू शकते. तेव्हा इथून पुढे कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करताना जर जपूनच!

LEAVE A REPLY

*