ही काळजी घ्याल तर मैत्रिण देणार नाही नकार

0

बऱ्याचवेळा मैत्रिणीला काय पाहिजे हे मुलांना कळत नाही. त्यामुळे मुली नाराज होतात किंवा त्यांना भावही देत नाहीत.

आपल्या आवडणाऱ्या मुलीची किंवा मैत्रिणीसंदर्भातील नात्यात या पुढील गोष्टी नक्कीच उपयोगी पडतील.
  • मुलींना त्यांची मनापासून काळजी घेणारा मित्र असावा असे वाटते. त्यामुळे तुम्ही मैत्रिणीची काळजी घ्याल आणि तिला नेहमी आनंदी ठेवाल, तर ती नक्कीच तुमचा विचार करेल.‍
  • देखावा टाळा : विनाकारण भाव मारणे, देखावा करणे, किंवा रस्त्यावर जोराते बाईक चालविणे, झँगपँग कपडे घालणे इत्यादी दिखाव्याच्या गोष्टी मुले करतात. पण मुलींना नेमक्या याच गोष्टी आवडत नाही. देखावा न करणारी मुले मुलींना भावतात.
  • अतिघाई संकटात नेई : तुमचे नाते पुढे वाढविताना अजिबात घिसाडघाई करू नका. ‘मला फ्रेंडशीप देते का?’ वगैरे म्हणून तिच्यावर जबरदस्तीने नाते लादू नका. मैत्रीचे नाते हळवार असते. ते फुलविण्यासाठी मुलीला आवश्यक तेवढा वेळ दिला पाहिजे. नाही तर उलटा परिणाम होऊन ती तुम्हाला झिडकारू शकते.
  • स्वच्छ आणि नेटके कपडे घाला : मुलीला भेटताना आणि एरवीही आपले कपडे स्वच्छ आणि नेटके हवे. नाहीतर शर्टची गुंडी उघडी, गबाळा टीशर्ट, चित्रविचित्र कपडे यामुळे तुमच्याविषयी मुलीचे मत प्रतिकूल होऊ शकते. त्यामुळे शोभतील असे, नेटके, व्यवस्थित कपडे परिधान करा.
  • झुठ बोले कौआ काटे : मुलींना खोटे बोलणारे मित्र आवडत नाहीत. त्यामुळे उगीच मुलींना चाटा देऊ नका. खरी कारणे सांगा. खरे बोला.
  • मुलींना खूप मोठी भेटवस्तू पाहिजे असते असे नाही. छोटे चॉकलेटसुद्धा त्यांना भेट म्हणून दिले तरी चालेल.
  • मुलींच्या किंवा मैत्रिणींच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली, तर त्यांना नेहमीच सुरक्षित वाटेल आणि त्या तुमच्याशी मैत्री करू शकतील.

LEAVE A REPLY

*