शिर्डी विमानतळाचे उदघाटन झाले; प्रकल्पग्रस्त काकडीचे प्रश्न सुटणार कधी?

0

शिर्डी : बहुप्रतिक्षित शिर्डी (काकडी) विमानतळाचे रविवारी उदघाटन झाले. मात्र त्यासोबत विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कधी मार्गी लागणार, असा सवाल आता जोर धरू लागला आहे.

रविवारी सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विमानतळाचे लोकार्पण झाले. या सोहळ्याचा कोणताही प्रचार- प्रसार करायचा नाही, असे धोरण सरकारकडून आखण्यात आल्याचे दिसून आले. कार्यक्रम उरकून घेण्याचा सरकारी मानस यातून उघड झाल्याचे म्हटले जात आहे.

काकडी येथील प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी काकडी येथील ग्रामस्थ आणि आ.बाळासाहेब थोरात मित्र मंडळाने पुढाकार घेतला. अन्यथा सध्या सभागृहाचे उदघाटन करताना मोठा गाजावाजा करण्याची सवय असलेल्या सरकारला हा सोहळा जगाला कळू नये, असे वाटत असल्याचे दिसते.

काकडी ग्रामस्थांनी काकडी विमानतळ उभारणीचा निर्णय घेणार तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांची आठवण काढतानाच, उदघाटन झाले आता काकडी विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त करून सरकारला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

गम्मत म्हणजे काकडी गावात विमान उतरणार पण बस येत नव्हती. ग्रामस्थांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. मात्र एसटी महामंडळाने शनिवारी घाईघाईत गावासाठी दोन फेऱ्या सुरू केल्या. त्यामुळे विमानआधी एसटी बस गावात आल्याची नोंद झाली.

LEAVE A REPLY

*